शिवटेकडीवर शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यासाठी फेरनिविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 10:54 PM2019-01-07T22:54:19+5:302019-01-07T22:54:38+5:30

महापालिकेच्या निधी अंतर्गत शिवटेकडीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रांझचा १२ फुटी अश्वारूढ पुतळा तयार करून उभारणे, याकरिता दोनच निविदा प्राप्त झाल्याने फेरनिविदा बोलाविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शहर अभियंता रवींद्र पवार यांनी दिली.

Revised for Shivaraya's horse-mounted statue on Shivteraqadi | शिवटेकडीवर शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यासाठी फेरनिविदा

शिवटेकडीवर शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यासाठी फेरनिविदा

Next
ठळक मुद्देशहर अभियंत्यांची माहिती : दोन निविदा प्राप्त झाल्याने निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिकेच्या निधी अंतर्गत शिवटेकडीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रांझचा १२ फुटी अश्वारूढ पुतळा तयार करून उभारणे, याकरिता दोनच निविदा प्राप्त झाल्याने फेरनिविदा बोलाविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शहर अभियंता रवींद्र पवार यांनी दिली.
शिवटेकडीवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा १२ फुटी अश्वारूढ पुतळा शिकस्त झाल्याने त्याच ठिकाणी ब्रांझचा १२ फुटी अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. यासाठी १२ डिसेंबरला ई-निविदा काढण्यात आली. सोमवारी निविदा उघडण्यात आली असता केवळ दोन निविदा प्राप्त झाल्याने यासाठी शासन निर्णयाप्रमाणे पुन्हा फेरनिविदा काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याची माहिती बांधकाम विभागाचे शहर अभियंता रवींद्र पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात महापालिकेच्या समितीची गत आठवड्यात बैठक झाली. त्यावेळी पुतळ्याच्या फाऊंडेशन संदर्भात चर्चा झाली व समितीच्या सर्व सदस्यांनी प्रत्यक्ष शिवटेकडीवर जाऊन स्थळाची पाहणी केली. यावेळी अभियंता व वास्तू शिल्पकार सुशील खंडारकर यांनी समिती सदस्यांशी संवाद साधला. त्यानुसार सोमवारच्या निविदेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, दोनच निविदा आल्याने फेरनिविदेचा निर्णय घेण्यात आला. या निविदेला मुदतवाढ देण्यात येईल, असे सांगण्यात आले.

Web Title: Revised for Shivaraya's horse-mounted statue on Shivteraqadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.