अचलपुरातील ऐतिहासिक वास्तूंची परिक्रमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 05:00 AM2020-03-03T05:00:00+5:302020-03-03T05:00:22+5:30

बी.एस. पाटील महाविद्यालय येथून परिक्रमा कार्यक्रमाला सुरुवात झाली. विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे, प्राचार्य आर.ए. उमेकर, गड-किल्ले अभ्यासक जयंत वडतकर, पोलीस निरीक्षक सदानंद मानकर, वनक्षेत्रपाल एस.बी. बारखडे, धनंजय नाकिल, सामाजिक कार्यकर्ते शिवा काळे, योगेश खानजोडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Revolve around historical sites in Achalpur | अचलपुरातील ऐतिहासिक वास्तूंची परिक्रमा

अचलपुरातील ऐतिहासिक वास्तूंची परिक्रमा

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांचा समावेश: स्मृती जागवल्या

परतवाडा : अचलपूर शहरातील ऐतिहासिक वास्तूंची ओळख करून घेण्यासाठी शनिवारी जिल्ह्यातील विविध तालुक्यांच्या शेकडो विद्यार्थ्यांनी आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन, स्वराज्य प्रतिष्ठान, वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था (अमरावती) यांच्या संयुक्त विद्यमाने परिक्रमा कार्यक्रमात सहभाग घेतला.
बी.एस. पाटील महाविद्यालय येथून परिक्रमा कार्यक्रमाला सुरुवात झाली. विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे, प्राचार्य आर.ए. उमेकर, गड-किल्ले अभ्यासक जयंत वडतकर, पोलीस निरीक्षक सदानंद मानकर, वनक्षेत्रपाल एस.बी. बारखडे, धनंजय नाकिल, सामाजिक कार्यकर्ते शिवा काळे, योगेश खानजोडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. उपक्रमाकरिता आदिवासी पर्यावरण संघटनचे संजय डोंगरे, सुरेश प्रजापती, राजेश मुंदे, प्रदीप चांदूरकर, अक्षय उमप, ममता डहाके, स्वराज्य प्रतिष्ठानचे प्रफुल रुईकर, प्रतीक पाथरे, प्रफुल पाथरे, काटोलकर, ओंकार पितळे, एकनाथ तट्टे यांनी परिश्रम घेतले.

जगदंब विद्यालयात समारोप
दूल्हे रहमान शाह दर्गा, दुल्हा दरवाजा, तटबंदी व पाणी व्यवस्थापन यंत्रणा, बारादारी, बेबहा बाग, हौज कटोरा, दत्तमंदिर, सुलतान गढी किल्ला, ईदगाह, मंडलेश्वर मंदिर, राजा मानसिंग यांची समाधी, बुंदेलपुरा दरवाजा, हिरापुरा दरवाजा, देवडी, तापे भारती मठ या सर्व वास्तूंना भेट देऊन जगदंब महाविद्यालयात समारोप झाला.

Web Title: Revolve around historical sites in Achalpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.