रिद्धपूर येथे एकाच रात्री आठ दुकाने, एक घर फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 11:10 PM2018-10-29T23:10:49+5:302018-10-29T23:11:04+5:30

शिरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रिद्धपूर येथे रात्री १२ वाजेपर्यंत शिरखेड पोलीस रिद्धपूर येथे गस्तीवर होते. मात्र, तरीही बाजारातील आठ दुकाने व एक घर फोडून चोरांनी अंदाजे ५० हजार रूपये लंपास केल्याची घटना रविवारी मध्यरात्री अडीच वाजता घडली.

At Riddpur, eight shops, one house was destroyed at one night | रिद्धपूर येथे एकाच रात्री आठ दुकाने, एक घर फोडले

रिद्धपूर येथे एकाच रात्री आठ दुकाने, एक घर फोडले

googlenewsNext
ठळक मुद्देचोर सीसीटीव्हीत कैद : ५० हजारांचा ऐवज लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
रिद्धपूर : शिरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रिद्धपूर येथे रात्री १२ वाजेपर्यंत शिरखेड पोलीस रिद्धपूर येथे गस्तीवर होते. मात्र, तरीही बाजारातील आठ दुकाने व एक घर फोडून चोरांनी अंदाजे ५० हजार रूपये लंपास केल्याची घटना रविवारी मध्यरात्री अडीच वाजता घडली.
यामध्ये वंदना किराणा दुकानाचे लोखंडी रॉडने दुकानाचे शटर वाकवून दोन चोरांच्या तोंडाला रूमाल बांधून चोर या किराणा दुकानातून पैसे चोरताना महेश मुंदडा यांनी दुकानासमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यांच्या दुकानातील रोख रक्कम नऊ हजार व दुकानातील काजू, बदाम, किसमिस असा तीन हजारांचा माल चोरांनी नेला. दुकानातील वस्तूची नासधुस केली.
राऊळ जनरल स्टोअर्स सचिन सिनकर यांच्या दुकानातील रोख तीन हजार रूपये नेले. सर्वज्ञ क्लिनिक व प्रवीण इलेक्ट्रॉनिक्समध्ये चोराला काहीच मिळाले नाही. नुमान हार्डवेअर रफीक खान यांच्या दुकानामधून रोख रक्कम १५०० रूपये गेले, विश्वकर्मा फर्निचरच्या दुकानात साहित्य फेकफाक करण्यात आले. अमर मेडिकलमधून २२ हजार रूपये चोरांनी लंपास केले. दुकाने फोडण्यापूर्वी चोरांनी दुकानाच्या आजूबाजूच्या घराचे बाहेरील दाराच्या कडी बाहेरून लावून घेतल्या होत्या.
नागरिकांना सकाळी याची माहितीहोताच शिरखेड पोलिसांना कळविण्यात आले. शिरखेड पोलिसांनी महेश मुंदडा यांच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासून घटनेचा पंचनामा केला. काही महिन्यापूर्वी नेरपिंगळाई येथे झाली होती परंतु या चोरीचा देखिल तपास अजूनपर्यंत शिरखेड पोलिसांनी लावला नसून अशीच घटना रिद्धपूर येथे आठ दुकाने फोडून चोर पसार झाले आहे. या चोरीचा तपास शिरखेड पोलीस लावणार काय, याकडे रिद्धपूर येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: At Riddpur, eight shops, one house was destroyed at one night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.