धामणगावात लसीच्या पहिल्या डोजसाठी रीघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:10 AM2021-07-04T04:10:05+5:302021-07-04T04:10:05+5:30
धामणगाव रेल्वे : शासनाने १८ ते ४५ वयोगटातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात केल्याने शनिवारी या वयातील ...
धामणगाव रेल्वे : शासनाने १८ ते ४५ वयोगटातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात केल्याने शनिवारी या वयातील शेकडो युवक-युवतींनी ग्रामीण रुग्णालयात रीघ लावली होती.
धामणगाव तालुक्यात वयाच्या ६० वर्षांवरील महिला पुरुषांचे ९८ टक्के लसीकरण झाले. तद्नंतर ४५ वरील वयोगटातील ७० टक्के लसीकरण आटोपले असून, शनिवारी दुसरा डोससाठी लसीकरण करण्यात आले. दरम्यान वयाच्या १८ ते ४५ वयोगटातील पहिला लसीकरणाचा डोस आपल्याला मिळावा म्हणून दुपारी दोन वाजतानंतर ग्रामीण रुग्णालयात नोंदणी झाली तद्नंतर नोंदणी केलेल्या २५० जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. तालुक्यातील पाच केंद्रावर या वयोगटातील तरुणांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला. दरम्यान धामणगाव ग्रामीण रुग्णालयात आगामी दोन दिवस लसीकरणाच्या मोहिमेचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश साबळे यांनी दिली.