धामणगाव तालुक्यात ५३ जणांना मतदानाचा अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:10 AM2021-07-10T04:10:13+5:302021-07-10T04:10:13+5:30

जिल्हा बँक संचालक निवडणूक ३५ सेवा सहकारी संस्थेने निवडले प्रतिनिधी धामणगाव रेल्वे : आगामी काळात होणाऱ्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती ...

Right to vote for 53 persons in Dhamangaon taluka | धामणगाव तालुक्यात ५३ जणांना मतदानाचा अधिकार

धामणगाव तालुक्यात ५३ जणांना मतदानाचा अधिकार

googlenewsNext

जिल्हा बँक संचालक निवडणूक

३५ सेवा सहकारी संस्थेने निवडले प्रतिनिधी

धामणगाव रेल्वे : आगामी काळात होणाऱ्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी धामणगाव तालुक्यातील ३५ सेवा सहकारी, तर इतर १८ सेवा सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाने आपल्या संस्थेतून प्रतिनिधींची निवड केली आहे. आगामी निवडणुकीत तालुक्यातून निवडणूक रिंगणात उभे राहणाऱ्या उमेदवाराला हे ५३ प्रतिनिधी मतदान करतील.

आगामी काळात होणाऱ्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. यासाठी या तालुक्यातून एक संचालक निवडून द्यावयाचे आहे. यासाठी धामणगाव तालुक्यात ५३ विविध सहकारी संस्था पैकी ३५ सेवा सहकारी संस्था, तर गृहनिर्माण, मजूर तसेच कर्मचारी, शेतमाल प्रकिया सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाने मागील आठवड्यात आपल्या प्रतिनिधीची निवड केली आहे.

सेवा सहकारी संस्था मर्यादित देवगाव -विशाल जयस्वाल, वाढोना- पंकज गायकवाड, अंजनसिंगी- मारोतराव बापूराव काळे, निंबोली -पुष्पा कृष्णराव नाकाडे, तरोडा- सुधाकर भाऊराव जगताप, सोनेगाव- विकास एकनाथ माळोदे , वाठोडा- गौरी गौरव जायले, अशोकनगर -पुष्पा गुणवंत कडू, पिपळखुंटा- राजेश गोविंदराव राऊत, विरूळ रोंघे -कुणाल प्रमोद रोंघे, खर्डा- निरंजन देशमुख, तळणी - विजय भैसे ,काशीखेड- अनिल बगाडे, विटाळा- रामकृष्ण चिंधू उईके, दिघी महल्ले- मेघा प्रशांत सबाने, आष्टा - रेखा विजय उगले, मंगरूळ दस्तगीर- संगीता रतनलाल भुतडा, चिचोली- सुरेश लक्ष्‍मण ठाकरे, सावळा- अशोक कृष्णराव टेकाडे, वडगाव -नलिनी जगजीवन हांडे, कावली -अविनाश भाऊराव इंगळे, दत्तापूर -श्रीकांत भीमराव गावंडे, सोनोरा -मोहन रामदास चव्हाण, आसेगाव- अविनाश बबन मांडवगणे ,वाघोली -वसीम खा शाफिखा पठाण, नायगाव- सुनील प्रतापसिंह शीसोदे,दाभाडा-राजेश बाबाराव माहोरे,शेंदुरजना खुर्द- रजनी गुणवंत समोसे, तुळजापूर- रामदास निस्ताने, जळगाव आर्वी- अतुल नरेंद्र भोगे, गव्हा फरकाडे- विजय भाऊराव चकवे, तळेगाव दशासर- स्मिता संजय काळबेंडे, कासारखेड- राजेंद्र एकनाथ कांबळे, ढाकुलगाव- नामदेव गुलाब वऱ्हाडे, कामनापूर- राजू अण्णाजी पाटील यांची सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाने मतदान प्रतिनिधी म्हणून निवड केली आहे. गजानन शेतमाल प्रक्रिया- मनोहर चंपत अडसड, गजानन सहकारी सूत गिरणी- मनीष मनोहर जाधव, शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंग संस्था- भीमराव चंपत देशमुख, दत्तापूर धामणगाव खरेदी-विक्री संघ -प्रदीप रतनलाल मुंदडा, जय महालक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था -वर्षा वसंत देशमुख, नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्था प्रतापदादा अरुणभाऊ अडसड, गणेश दत्तापूर नागरी सहकारी संस्था- प्रेमनारायण रामचंद्र चौबे, कल्पतरू कर्मचारी संस्था- काशिनाथ बकाराम काकडे, चंद्रभागाबाई पाकोळे विद्यालय सेवकांची सहकारी संस्था- प्रकाश उत्तमराव मारोडकर, नगर परिषद कर्मचारी संस्था -नरेंद्र अण्णाजी चौधरी, राष्ट्रमाता जिजाऊ कर्मचारी संस्था- संजय अण्णाजी शेंडे, धामणगाव शिक्षण संस्था सेवकांची पतसंस्था- रवींद्र सुदामगिर गिरी, बेलदार मजूर सहकारी संस्था- प्रवीण मधुकर बमनोटे, समर्थ बगाजी मजूर सहकारी संस्था- रेखा प्रदीप देशमुख, पृथ्वीराज गृहनिर्माण संस्था- राजाभाऊ टेंभरे,चांदूर तालुका गृहनिर्माण संस्था- ज्ञानेश्वर केशव साबळे, आशीर्वाद गृहनिर्माण संस्था ईश्वरसिंग खाकस, सर्वोदय नवनिर्माण संस्था- विजया ज्ञानेश्‍वर साबळे यांची प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे.

धामणगाव तालुक्यातील ५३ सेवा सहकारी संस्था व इतर सहकारी संस्थेतून प्रतिनिधी निवडले आहे त्यांची मतदार यादी मी आगामी काळात होणाऱ्या जिल्हा अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आली आहे

- राजेश मदारे,

सहाय्यक निबंधक,

सहकारी संस्था धामणगाव रेल्वे

Web Title: Right to vote for 53 persons in Dhamangaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.