युवा पिढीचा सोशल मीडियावर दंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:11 AM2020-12-25T04:11:41+5:302020-12-25T04:11:41+5:30

चांदूर बाजार : निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा केल्यापासून ग्रामीण भागात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यामुळे गावातील ...

Riot of young generation on social media | युवा पिढीचा सोशल मीडियावर दंगा

युवा पिढीचा सोशल मीडियावर दंगा

googlenewsNext

चांदूर बाजार : निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा केल्यापासून ग्रामीण भागात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यामुळे गावातील चावडीवर मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत निवडणुकीच्या चर्चा झडत आहेत. आता तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने त्या चर्चा नॉनस्टॉप रंगू लागल्या आहेत. युवा पिढीने तर सोशल अक्षरश: दंगा घातला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीला केवळ २० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. कोरोना संक्रमणाची खबरदारी म्हणून या निवडणुका लांबवण्यात आल्या होत्या. ग्रामपंचायतीच्या आर्थिक व अधिकारात झालेली वाढ बघता, अनेकांना राजकारण खुणावू लागले आहे. युवक वर्गही मोठ्या प्रमाणात याकडे आकृष्ट होऊ लागला आहे, हे चांगले चिन्ह मानले जाते. युवकांचा सहभागाने अनेकांची एकाधिकारशाही आता संपुष्टात येणार असल्याचे दिसते. गेल्या काही काळापासून नागरिकांमध्ये आता जागरूकता आलेली आहे. तरीही त्यांना निवडणुका जिंकणे कठीण झाले आहे. कार्यकर्ते पोसणे, निवडणुकीतील अपार खर्च यामुळे एखादा गरीब नेता नेतृत्वगुण असूनही निवडून येणे कठीण आहे. मात्र, शेवटी मतदार ठरवतील तोच नेता निवडून येईल, हे जरी खरे असले तरी सत्तास्थापनेच्या वेळी पडद्याआड अनेक राजकीय घडामोडी असतात. मतदारांनी दिलेला कौल डावलून सत्ता स्थापन केली जाते. अशी अनेक उदाहरणे आहेत. यामुळे गुलाबी थंडीत सध्या या राजकीय चर्चेशिवाय दुसरी चर्चा ग्रामीण भागात आढळलेली नाही.

-------------------

Web Title: Riot of young generation on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.