रिपाइंचे राहुटी आंदोलन
By Admin | Published: August 10, 2016 11:56 PM2016-08-10T23:56:35+5:302016-08-10T23:56:35+5:30
स्थानिक पंचशिलनगरात भाड्याने वास्तव करीत असलेल्या बेघरांना रहाटगाव येथील ई-क्लासची जागा द्यावी,...
जिल्हाधिकाऱ्यांना साकडे : बेघर भाडेकरुंना ई- क्लासची जागा द्या
अमरावती : स्थानिक पंचशिलनगरात भाड्याने वास्तव करीत असलेल्या बेघरांना रहाटगाव येथील ई-क्लासची जागा द्यावी, या मागणीसाठी बुधवारी रिपाइं (गवई गट)च्या वतीने राहुटी आंदोलन करण्यात आले. शेकडो गृहिंणीनी या आंदोलनात खिचडी शिजवून मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
राहुटी आंदोेलनाचे नेतृत्व रिपाइंच्या नेत्या कमलताई गवई यांनी केले. निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर यांना निवेदन सादर करण्यात आले. तत्पूर्वी रिपाइंचे जिल्हा संघटक अमोल इंगळे, मनोज थोरात, मनोज वानखडे, उमेश इंगळे, गौतम मोहोड, किरण तेलमोरे, दीपक सरदार आदींनी राहुटी आंदोलनाची धुरा सांभाळली. आंदोलकांनी दिलेल्या निवदेनानुसार २५ वर्षांपासून पंचशिलनगरात शेकडो नागरिकांचे वास्तव्य आहे. मात्र हे सर्व नागरिक भाड्याने राहत असल्यामुळे त्यांना हक्काचे घर नाही अथवा कायम स्वरुपी जागा नाही, ही बाब पोटतिडकीने मांडली. बेघर भाडेकरुंना आश्रय मिळावा, यासाठी रहाटगाव येथील ई- क्लासची जागा सर्वे क्र. १२१ ही कायम स्वरुपी देवून न्याय प्रदान करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सुलभा तेलमोरे, नीता इंगळे, बबीता वाघमारे, विद्या खडसे, रिता कुळकर्णी, उज्वला तायडे, छाया बरडे, दीक्षा जामनिक, सुनंदा इंगळे, जयश्री सोमकुंवर सारीका इंगोले, रत्ना नारनवरे, प्रणीता लोहकरे आदी उपस्थित होते.