वाढत्या महागाईमुळे बांधकाम कामगारांवर अवकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:10 AM2021-04-29T04:10:42+5:302021-04-29T04:10:42+5:30
तिवसा : कोरोनाचे काळात वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्य जनता सोसत असतांना बांधकामासाठी आवश्यक असणारे रेती, ...
तिवसा : कोरोनाचे काळात वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्य जनता सोसत असतांना बांधकामासाठी आवश्यक असणारे रेती, विटा, लोहा सिमेंट यांचे भाव गगनाला भिडले असल्यामुळे घराचे बांधकाम करणे जवळजवळ बंद अवस्थेत असल्यामुळे यावर अवलंबून असणाऱ्या बांधकाम गवंडी मिस्त्री, सेन्ट्रींग व्यवसायिक, कामगार व मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. एक वर्षांपासून कोरोना महामारीचे संकट उभे झाले आहे.
लॉकडाऊन असल्यामुळे व्यवसाय व्यापरपेठ बंद अवस्थेत असून यामुळे महागाई देखील गगनाला भिडली आहे. त्यातच अनेकांना आपला उदरनिर्वाह बांधकाम व्यवसाय यावर अवलंबून राहते. मात्र बांधकाम करण्याकरिता लागणारे साहित्याने महागाईचे कळस गाठले आहे. यामुळे घराचे, घरकुळाचे बांधकाम कसे करावे, हा प्रश्न बांधकाम धारकांसमोर उभा झाला.
बांधकाम करण्यासाठी आवश्यक असणारे लोहा ६ हजार रुपये किंटल, सिमेंट ४०० रुपये बॅग, विटा ११ हजार रुपये, रेती ६ हजार रुपये ट्रॅक्टर, गिट्टी व इतर लागणाऱ्या वस्तू महाग असल्यामुळे बांधकाम बंद झाले आहे. पर्यायाने यावर अवलंबून असणाऱ्या कामगारांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
बांधकामाचा रेट कमी करूनदेखील आवश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने बांधकामाचा वेग मंदावला आहे. त्यातच लॉकडाऊनचा फटका कामगारांना बसला असून, काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ कामगारांवर आली असल्याचे यावर अवलंबून असणाऱ्या कामगारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.