वाढत्या महागाईने बिघडले घर खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:11 AM2021-07-20T04:11:05+5:302021-07-20T04:11:05+5:30

खाद्यतेलाचे भाव वाढले तब्बल एकशे साठ रुपयांच्या वर दिले आहे. या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक डबघाईस आला आहे. सोबतच भाजीपाल्याचे ...

Rising inflation hurts home spending | वाढत्या महागाईने बिघडले घर खर्च

वाढत्या महागाईने बिघडले घर खर्च

Next

खाद्यतेलाचे भाव वाढले तब्बल एकशे साठ रुपयांच्या वर दिले आहे. या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक डबघाईस आला आहे. सोबतच भाजीपाल्याचे भाव वाढल्याने रोजच्या जेवणामध्ये भाजीचे नियोजन कसे करावे या विचारात मात्र गृहिणी असते.

ग्रामीण भागातील अनेक सुशिक्षित तरुण, तसेच काही नागरिक पोटाची खळगी भरण्यासाठी मोठ्या शहरात गेली होती; परंतु कोरोना व्हायरसने त्यांना परत गावाकडची वाट दाखविली असल्याचे दिसत आहे. त्या ठिकाणी रोजगार हिरावला गेला. आता जगावे कसे ही मोठी समस्या निर्माण झाल्याने आता गावातही रोजगार मिळणे कठीण झाले. त्यातच जीवनावश्यक वस्तूचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहे.

एकीकडे कडधान्याचा भाजी म्हणून उपयोग करायचा, परंतु त्याचेही भाव वाढत आहे. चना दाळ तूरडाळ याचे भाव सोबतच शेंगदाणा तेल सोयाबीन तेल वाढली आहे. खाद्यतेलाच्या किमतीत झालेली भरमसाट वाढ सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी आहे. त्यातच महिनाभरापूर्वी घरगुती गॅस सिलिंडर दरसुद्धा वाढले आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना घर चालविणे कठीण बनले आहे. हे दर नियंत्रणात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सोबतच राजकीय नेतेसुद्धा मोर्चे काढून आपल्या मागण्या सरकार समोर मांडत आहे.

गेल्या महिन्यात पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने अनेक नागरिक आपल्या घरचे दुचाकी गाडी वापरण्यास कमी केले आहे.

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले असल्याचे चित्र दिसत आहे.

रेशन मोफत मिळत असले तरी तेल मीठ त्याचा खर्च मात्र कोण देईल या चिंतेत सर्वसामान्य नागरिक बोलत आहे.

Web Title: Rising inflation hurts home spending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.