पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्याने शेतीची मशागत महागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:16 AM2021-06-09T04:16:22+5:302021-06-09T04:16:22+5:30

शेतकरी अडचणीत : वरूड : राज्यात पेट्रोल, डिझेलचा भडका उडाल्याने किमतीने शंभरी गाठली. यामुळे ट्रॅक्टरमालकांनी शेतीकामाचे दर वाढविले ...

Rising prices of petrol and diesel have made farming more expensive | पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्याने शेतीची मशागत महागली

पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्याने शेतीची मशागत महागली

Next

शेतकरी अडचणीत :

वरूड : राज्यात पेट्रोल, डिझेलचा भडका उडाल्याने किमतीने शंभरी गाठली. यामुळे ट्रॅक्टरमालकांनी शेतीकामाचे दर वाढविले असून फंटिंग, व्ही-पास, रोटाव्हेटरकरिता ८०० रुपये प्रतिएकर, तर नांगरणीकरिता १५०० रुपये मोजावे लागतात. पेट्रोल, डिझेल दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे . लॉकडाऊनमुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना शेतीची मशागत कशी करावी, हा प्रश्न पडला आहे. यामुळे ४० टक्के मशागतीची कामे अपूर्ण आहेत.

महागाईने कळस गाठल्याने पेट्रोल, डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. ९० रुपये प्रतिलिटर डिझेल, तर १०२ रुपये ६६ पैसे पेट्रोलचा दर झाल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. शेतीची मशागत करणाऱ्या ट्रॅक्टरमालकांनी दर वाढविले. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसल्याने मशागतीकरितासुद्धा पैसे नाहीत. सोसायटी, बँकांचे कृषिकर्जसुद्धा लॉकडाऊनमुळे उशिरा मिळाले. कर्जबाजारी होऊन उसनवार, सावकारी कर्ज घेऊन शेतीची मशागत सुरू केली असली तरी तालुक्यात अद्याप ४० टक्के क्षेत्र शिल्लक आहे. यामुळे पेरणीसुद्धा उशिरा होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

Web Title: Rising prices of petrol and diesel have made farming more expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.