नदीपात्र झाले डंपिंग यार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 11:10 PM2017-09-13T23:10:38+5:302017-09-13T23:11:20+5:30
शहरातून गोळा करण्यात आलेला कचरा बिच्छन नदीपात्रात टाकण्यासह रस्त्यावरच मृत जनावरांना टाकला जात असल्याचा ....
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : शहरातून गोळा करण्यात आलेला कचरा बिच्छन नदीपात्रात टाकण्यासह रस्त्यावरच मृत जनावरांना टाकला जात असल्याचा संतापजनक प्रकार एलआयसी चौक ते कोर्ट रस्त्यावर दररोज झाला आहे. नगरपालिकेने चक्क नदीपात्रालाच डंपिंग यार्ड केल्याने येथे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत देशभर स्वच्छतेचा संदेश दिला जात असताना परतवाडा-अचलपूर जुळ्या शहरात ठिकठिकाणी कचºयाचे ढिगारे आरोग्याशी खेळणारे ठरत आहे, तर परतवाडा शहरातील कचरा संकलन करून थेट बिच्छन नदीपात्रात टाकला जात आहे. रस्त्यावर राजा शिवाजी विद्यालय, उपविभागीय कार्यालय, एसडीपीओकाची जिल्हा न्यायालय, नझूल कार्यालय, कल्याण मंडपम, विद्यानिकेतन कॉलनी, आझादनगर परिसर आहे.
सहा ट्रॅक्टर, आठ आॅटो
परतवाडा व अचलपूर शहरातील कचरा उचलण्यासाठी कंत्राट दिला त्यापैकी परतवाड्यातील कचरा उचलण्यासाठी ६ ट्रॅक्टर व आठ आॅटोतून कचरा संकलनाचे काम करण्यात येते. कल्याण मंडपमनजीकच्या बिच्छन नदीपात्रात अवैधरीत्या कंत्राटदाराने डंपिंग ग्राऊंड तयार केल्याचा प्रकार पुढे आला आहे.
रस्त्यावरच मृत जनावरे
अचलपूर नगर परिषदेच्यावतीने परतवाडा शहरातून गोळा करण्यात येणारा कचरा मिनी टेम्पोतून बिच्छन नदीपात्रात टाकण्यात येत असताना शहरात मृत पडलेले वराह थेट रस्त्यावरच टाकण्यात येत असल्याचा प्रकार नेहमीचाच झाला आहे. मृत जनावरांच्या दुर्गंधीचा सामना रस्त्याने जाणाºया नागरिकांना करावा लागत आहे. तर मोकाट कुत्री मृत जनावरांवर ताव मारण्यासाठी थेट रस्त्यावरच आणून टाकीत असल्याचे संतापजनक दृश्य आहे.
रायपुरा परिसरात डंपिंग
बिच्छन नदीपात्रात टाकण्यात आलेला कचरा विनापरवानगीने टाकला असून अचलपूर शहरातील रायपुरा परिसरात नगर पालिकेच्यावतीने डंपिंग ग्राऊंड तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
राजा शिवाजी विद्यालयाच्या पुलानजीक गत आठवड्यापर्यंत घंटा गाड्यांतून जमा करण्यात आलेला कचरा टाकण्यात येत होता. मात्र आता त्यावर बंदी असून टाकणाºयाविरूद्ध कारवाही करण्यात येईल. अचलपूर शहरातील रायपुरा भागात डंपींग ग्राऊंड तयार करण्यात आले आहे.
- मो. जहीर, आरोग्य निरीक्षक, अचलपूर न.प.