‘आरओ’ प्लांटधारकांना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:41 PM2019-06-17T23:41:29+5:302019-06-17T23:41:46+5:30
पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्याकरिता रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि शोषखड्डा याबाबत शनिवारी महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी आढावा घेतला. प्रशासनास उपाययोजनांसंदर्भात सूचना देताना त्यांनी आरओ प्लांटधारकांना रेनवॉटर हार्वेस्टिंग न केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्याकरिता रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि शोषखड्डा याबाबत शनिवारी महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी आढावा घेतला. प्रशासनास उपाययोजनांसंदर्भात सूचना देताना त्यांनी आरओ प्लांटधारकांना रेनवॉटर हार्वेस्टिंग न केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.
शहरातील सर्व शाळा, दवाखाने, उद्याने, मंगल कार्यालये, मॉल, लॉन, महापालिका कार्यालये तसेच इतर सरकारी कार्यालये, खुले भूखंड या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग व शोषखड्डा त्वरित करून घ्यावा. यापैकी अनेक ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यात आली असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. वॉटर कॅन (आरओ प्लांट) व्यावसायिकांना रेन वॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य आहे. ज्या व्यवसायिकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग केले नसेल, त्यांना सोमवारपर्यंतची मुदत असून, त्यानंतर प्रशासकीय कारवाईच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. क्रेडाई संघटनेने रेन वॉटर हार्वेस्टिंगसंबंधी केलेले स्ट्रक्चर तपासण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी सहायक संचालक नगर रचना विभागाच्या अभियंत्यांना दिले. बैठकीला उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहायक आयुक्त योगेश पिठे, विशाखा मोटघरे, शहर अभियंता रवींद्र पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, शिक्षणाधिकारी अनिल कोल्हे, उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर, सहायक संचालक नगररचना सुदेश वासनकर, उपअभियंता सुहास चव्हाण, भास्कर तिरपुडे, प्रमोद इंगोले, तौसिफ काझी, मधुकर राऊत, श्यामकांत टोपरे, अभियंता अनंत पोतदार, प्रमोद कुलकर्णी, सुनील चौधरी, सुधीर गोटे, लक्ष्मण पावडे, नितीन भटकर, आरोग्य विभागाचे दिवाण आदी उपस्थित होते.
कीटकजन्य रोग प्रतिबंधाविषयी आढावा
राष्ट्रीय कीटकजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमांतर्गत डेंग्यू, चिकुनगुन्या प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर आढावा सभेचे आयोजन महापालिकेत करण्यात आले होते. या बैठकीला मनपा आयुक्त संजय निपाणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. तिरोडेकर, सहायक आयुक्त योगेश पिठे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे व अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विक्रांत राजूरकर यांनी मार्गदर्शन केले. कीटकजन्य आजाराबाबतची सद्यस्थिती व साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना महानगरपालिका स्तरावरून राबविण्यात येणाºया उपाययोजनांबाबत या सभेत आढावा घेण्यात आला.