अतिक्रमणाने गिळले अचलपूरचे रस्ते

By admin | Published: July 14, 2017 12:41 AM2017-07-14T00:41:49+5:302017-07-14T00:41:49+5:30

जुळ्यानगरीची वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या आणि अतिक्रमणाने अधिकच अरूंद झालेले रस्ते,

Road to Achalpur swallowed by encroachment | अतिक्रमणाने गिळले अचलपूरचे रस्ते

अतिक्रमणाने गिळले अचलपूरचे रस्ते

Next

वाहतूक बेशिस्त : जनता त्रस्त, अपघाताचा धोका कायम, वाहतुकीला अडथळा
सुनील देशपांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अचलपूर : जुळ्यानगरीची वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या आणि अतिक्रमणाने अधिकच अरूंद झालेले रस्ते, त्यात बेशिस्त वाहतुकीचा कहर यामुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत. अपघाताची शक्यता वाढली आहे. रस्त्याच्या दुतर्फा झालेले अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवीत असल्याचे चित्र आहे.
वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत रस्त्यांची रूंदी तेवढीच आहे. बाजारपेठ अधिक गजबजत चालली आहे. याआधीच अरूंद रस्त्यांवर व्यापाऱ्यांनी व हातगाड्याधारकांनी अतिक्रमण केल्याने रस्ते अधिकच अरूंद झाले आहेत. मात्र, हे अतिक्रमण हटविण्यात प्रशासन उदासीन असल्याने नागरिकांचे, वाहनधारकांचे हाल होत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. बियाणे खरेदीसाठी ग्रामीण भागातील शेतकरी बाजारपेठेत येत आहेत. शालेय साहित्य खरेदीची लगबगही सुरू आहे. त्यामुळे वर्दळ वाढली असून अतिक्रमण अधिकच डोकेदुखी ठरत आहे. भररस्त्यावर लागत असलेल्या हातगाड्यांमुळे वाहनांना अडसर निर्माण होत आहे.
दुकानदारांनी रस्त्यावर माल रचून ठेवल्याने पायी चालणेदेखील कठीण होते. वाहनधारकही बेशिस्त झाले आहेत. नियमांचे उल्लंघन करून वाहने दामटली जात आहेत. रस्त्यांवर किरकोळ अपघात एक दिवसाआड घडतात. येथील वाहतूक शाखेत कार्यरत सात कर्मचारी काही दिवसांपूर्वी परतवाडा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्याने अचलपूर शहरासाठी वाहतूक पोलीस नाहीत. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लावणार कोण, हा प्रश्नच आहे.
परतवाडा बसस्थानक वगळता कोठेही वाहतूक पोलीस नजरेस पडत नाही. त्यामुळे अवैध वाहतुकीला उधाण आले आहे. आॅटोचालकांवर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. वाहतूक व्यवस्था सुधारण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

अतिक्रमण हटविण्याची संपूर्ण तयारी पालिका प्रशासनाने केली आहे. तब्बल १ हजार अतिक्रमणधारकांची नावे यादीत आहेत. एसडीओ, पोलीस व महसूलचा समन्वय झाल्यास अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जाईल.
- सुनीता फिस्के, नगराध्यक्ष

Web Title: Road to Achalpur swallowed by encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.