रस्ता सुरू की बंद; राँग साईड वाहतूक जीवघेणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 11:25 PM2018-02-20T23:25:53+5:302018-02-20T23:26:11+5:30
बाबा कॉर्नर ते वाहतूक शाखेपर्यंतच्या सिमेंट मार्ग तयार झाला असतानाही एकेरी मार्गावर दुहेरी वाहतूक सुरूच आहे. कंत्राटदाराने मार्ग सुरू करण्यात आल्याचा सुचना फलक न लावल्याने वाहनचालक आता वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करीत आहेत.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : बाबा कॉर्नर ते वाहतूक शाखेपर्यंतच्या सिमेंट मार्ग तयार झाला असतानाही एकेरी मार्गावर दुहेरी वाहतूक सुरूच आहे. कंत्राटदाराने मार्ग सुरू करण्यात आल्याचा सुचना फलक न लावल्याने वाहनचालक आता वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करीत आहेत. या प्रकारची वाहतूक जीवघेणी ठरत असताना, काही अप्रिय घटना घडल्यास जबाबदारी कोणाची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरात सिमेंट रस्त्यांच्या कामे पूर्ण करण्यास विलंब होत असून, शहरातील अनेक ठिकाणी एकाच मार्गाने वाहनाची आवागमन सुरू आहे. ही बाब अपघातास आमंत्रण देणारी आहे. दररोज वाहनधारकांना किरकोळ अपघातांना सामोरे जावे लागत आहे. बाबा कॉर्नर ते इर्विन चौकाजवळील वाहतूक शाखेपर्यंत सिमेंट रस्त्याचे काम उशिरा का होईना पूर्ण झाले. कंत्राटदाराने काम पूर्ण झाल्याचे सूचना फलक लावले असते, तर वाहनचालकांना रस्ता सुरू असल्याचे कळले असते. मात्र, कंत्राटदाराला नागरिकांच्या समस्येचे काही देणघेणे नसल्याचे दिसून येत आहे. एकाच मार्गाने दुहेरी वाहतूक सुरु असल्यामुळे अपघातास आमंत्रण मिळण्यासोबत वायू-ध्वनिप्रदूषणाचा धोका वाढला आहे.
बाबा कॉर्नर ते वाहतूक शाखेपर्यंतच्या सिमेंट रस्ता तयार झाला असून, तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. वाहनचालकांना माहिती नसल्यामुळे राँग साइड वाहतूक होत आहे. रस्ता सुरू झाल्याचे फलक लावयाच्या सूचना कंत्राटदाराला देऊ.
- अर्जुन ठोसरे,
पोलीस निरीक्षक, वाहतूक