लोकसहभागातून शेतकऱ्यांनी बनविला रस्ता
By admin | Published: January 2, 2016 08:31 AM2016-01-02T08:31:48+5:302016-01-02T08:31:48+5:30
लोकसहभाग व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेच्या माध्यमातून युवा शेतकऱ्यांनी रोहणखेडा ते देवरा शेत रस्त्याचा शुभारंभ केला.
आदर्श संकल्पना : मग्रारोयो केले खडीकरण
नांदगाव पेठ : लोकसहभाग व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेच्या माध्यमातून युवा शेतकऱ्यांनी रोहणखेडा ते देवरा शेत रस्त्याचा शुभारंभ केला. वर्गणी करून शेतकऱ्यांनी स्वत: मातीकाम केले व योजनेच्या माध्यमातून त्यावर खडीकरणसुद्धा करण्यात येईल.
शेतीला रस्ता असल्याशिवाय आपण उत्पादन वाढवू शकत नाही तसेच चांगल्या प्रकारे नियोजन सुद्धा करू शकत नाही. त्यामुळे रस्ता ही प्रमुख बाब असून शेतकऱ्यांनी स्वत:च लोकवर्गणीतून माती रस्ता बनविला व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत लवकरच खडीकरणाला सुरुवात होईल.
रोहणखेडा देवरा मार्गाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार लबडे, सरपंचा साधना खडसे, उपसरपंच कमलेश तायडे, पो. पा. सतीश गोटे, गंगाधर भिलकर, रमेशअण्णा तायडे, जगदिश गोटे, नंदकिशोर तायडे, प्रवीण कोल्हे, शैलेश गोटे, इश्वरदास गोटे, अनिलपंत तायडे, दादाराव कोजळकर, सुनील बरवट, प्रवीण तायडे, नीलेश कडू, मोहन तायडे, गुणवंत खडसे, संदीप तायडे, श्रीकृष्ण गोटे, गजानन गोटे, भगतसिंग गिरासे, ग्रामसेवक राऊत, मंडल अधिकारी, तलाठी आदी उपस्थित होते. रोहणखेडा येथील शेतकऱ्यांचा आदर्श तालुक्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी नितीन हटवार यांनी केले. (प्रतिनिधी)