अंजनगावातील २२ वर्षे रखडलेला रस्ता मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:16 AM2021-08-24T04:16:22+5:302021-08-24T04:16:22+5:30
प्रशासकीय अडचण ठरला अडसर, अवघ्या अडीचशे मीटर रस्त्यासाठी नागरिकांचा पाठपुरावा अंजनगाव सुर्जी : शहरातील शिक्षक काॅलनीतील प्रभाग क्रमांक २ ...
प्रशासकीय अडचण ठरला अडसर, अवघ्या अडीचशे मीटर रस्त्यासाठी नागरिकांचा पाठपुरावा
अंजनगाव सुर्जी : शहरातील शिक्षक काॅलनीतील प्रभाग क्रमांक २ मधील जवळपास अडीचशे मीटर लांबीच्या रस्त्याचे काम प्रलंबित होते. अनेकदा रस्त्याच्या कामाला पालिकेकडून मंजुरात मिळूनसुद्धा काही प्रशासकीय अडचणींमुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यासाठी जवळपास बावीस वर्षे एवढा कालावधी लागला.स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा या विषयावर पालिकेकडे निवेदने दिली होती. नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे यांनी स्थानिक नागरिक प्राचार्य श्याम कळमकर व जयश्री कळमकर यांच्या हस्ते या रस्त्याचे भूमिपूजन करून घेतले व लगेच विनाविलंब प्रत्यक्ष रस्ता तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली. जवळपास दहा ते अकरा लाख रुपयांचा निधी या रस्त्याच्या कामासाठी खर्ची लागणार असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली.
दरम्यान, या रस्त्याला लागून असलेल्या चार घरांसमोरील रस्त्याचे बांधकामसुद्धा एवढ्याच कालावधीपासून रखडले असल्याने तेथील नागरिकांनी संतप्त होऊन पालिकेविरोधात आपला रोष नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे यांच्याकडे व्यक्त केला. या रस्त्याबाबत लवकरात लवकर मंजुरात देऊन कामाला सुरुवात करावी, अशी नागरिकांनी मागणी केली.
याप्रसंगी नगर परिषद उपाध्यक्ष सविता बोबडे, बांधकाम सभापती विमल माकोडे, नगरसेविका शीला सगणे, नगरसेवक कृष्णा गोमासे, गटनेता मनोहर भावे, नगरसेवक मधुकर गुजर तसेच नगर अभियंता ठेलकर व शिक्षक काॅलनीतील सुरेश काळमेघ, अजय इथापे, राहुल बोबडे, हितेश कळमकर, राजेंद्र घडेकार, मुकुंद हूड, स्वराज येवले, रेखाते आगी उपस्थित होते.