पालिकेचा रस्ता उठला नागरिकांच्या जिवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:13 AM2021-03-25T04:13:44+5:302021-03-25T04:13:44+5:30
फोटो - परतवाडा २४ एस रस्ता दुपदरीकरणाचे काम बंद : अपघाताला आमंत्रण परतवाडा : अचलपूर नगरपालिकेच्यावतीने शहरातील नागरिकांच्या सुविधेसाठी ...
फोटो - परतवाडा २४ एस
रस्ता दुपदरीकरणाचे काम बंद : अपघाताला आमंत्रण
परतवाडा : अचलपूर नगरपालिकेच्यावतीने शहरातील नागरिकांच्या सुविधेसाठी दुराणी चौक ते गुजरी बाजारपर्यंत रस्ता दुपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, पंधरा दिवसांपासून काम बंद असून, ते नागरिकांच्या जिवावर उठले आहे.
जयस्तंभ चौक ते गुजरी बाजारपर्यंत शहरातील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग आहे. याच परिसरात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक प्रतिष्ठाने असल्याने मार्गावर होणारी गर्दी टाळण्यासाठी पालिकेच्यावतीने पाच वर्षांपासून रखडलेल्या रस्ता दुपदरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात जयस्तंभ चौक ते पालिका मार्केटपर्यंत काम करण्यात आले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप झाल्याने काम रखडले होते. दोन महिन्यांपूर्वी नव्याने त्या कामाला सुरुवात झाली.
अखेर एकदाचे रस्त्याचे काम होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत होते. वाहतुकीची कोंडी काही प्रमाणात यातून सुटणार होती. मात्र, १५ दिवसांपासून संबंधित कंत्राटदाराने कामाचे देयक पालिकेने अदा न केल्यामुळे काम बंद केल्याची माहिती आरोग्य व स्वच्छता सभापती बंटी ककरानिया यांनी दिली मागील. दोन महिन्यांपासून अचलपूर नगरपालिकेला स्थायी मुख्याधिकारी नाही, तर प्रभारी मुख्याधिकारी आर्थिक विषय हाताळत नसल्याने अनेक देयके प्रलंबित असल्याची माहिती आहे.
कोट
अपघाताला आमंत्रण
देयके न मिळाल्याने रस्ता दुपदरीकरणाचे काम अर्धवट पडून आहे. दुसरीकडे अर्धवट कामावर पुन्हा विविध व्यावसायिकांनी अतिक्रमण करून लहान-मोठी दुकाने थाटली आहेत. परिणामी हा मार्ग आता अपघाताला आमंत्रण देणारा ठरला आहे. पालिकेने त्यावर तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे
कोट
पालिकेला स्थायी मुख्याधिकारी नसल्याने अनेक देयके प्रलंबित आहेत. संबंधित कंत्राटदाराने काही देयके होळी सणापूर्वी मजुरांना वेतन देण्यासाठी मागणी केली होती. पालिकेकडून मागणी पूर्ण न झाल्याने त्यांनी काम बंद केले आहे.
- बंटी ककरानिया, स्वच्छता व आरोग्य सभापती