18.23 कोटी निधीतून रस्त्यांचे जाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2022 05:00 AM2022-02-27T05:00:00+5:302022-02-27T05:00:59+5:30

ना. ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत मंजूर ३ कोटी ९ लक्ष रूपये निधीतून शिवणगाव ते शिरजगाव मोझरी रस्ता, २ कोटी ५० लक्ष रुपये निधीतून नेरपिंगळाई ते आखतवाडा (प्रजिमा १०३) रस्ता, १ कोटी ७७ लक्ष रुपये निधीतून शिरखेड येथे रा. मा. -३०० काटपूर ममदापूर ते शिरखेड रस्ता, २ कोटी ३८ लक्ष रुपये निधीतून कठोरा येथे रा. मा. -२९८ ए कठोरा टाकळी (पिंपरी गोपालपूर) ते व्हीआर रस्ता आदी कामांचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.

Road network out of 18.23 crore fund | 18.23 कोटी निधीतून रस्त्यांचे जाळे

18.23 कोटी निधीतून रस्त्यांचे जाळे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी भक्कम निधी उपलब्ध करून देण्यात येत असून, अनेक कामांना चालना मिळाली आहे. ग्रामीण भागात मजबूत रस्त्यांचे जाळे निर्माण होऊन विकासाला गती मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी केले.
ना. ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत मंजूर ३ कोटी ९ लक्ष रूपये निधीतून शिवणगाव ते शिरजगाव मोझरी रस्ता, २ कोटी ५० लक्ष रुपये निधीतून नेरपिंगळाई ते आखतवाडा (प्रजिमा १०३) रस्ता, १ कोटी ७७ लक्ष रुपये निधीतून शिरखेड येथे रा. मा. -३०० काटपूर ममदापूर ते शिरखेड रस्ता, २ कोटी ३८ लक्ष रुपये निधीतून कठोरा येथे रा. मा. -२९८ ए कठोरा टाकळी (पिंपरी गोपालपूर) ते व्हीआर रस्ता आदी कामांचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्यांच्या पाठपुराव्याने ग्रामसडक योजनेत सुकळी येथे ४ कोटी ४७ लक्ष रूपये निधीतून प्र. रा. मा. -१४ (चांगापूर) ते कामुंजा रा. मा. ३०९ (सुकळी ते वनारसी) रस्ता,  गौरखेडा येथे ३ कोटी ६२ लक्ष रूपये निधीतून प्र. जि. मा. -२४ (निंभोरा) गौरखेडा ते बोरखेडा व्हीआर ८२ रस्त्याचे बांधकामाचा ही समावेश करण्यात आला आहे.
पालकमंत्री  ठाकूर म्हणाल्या की, पीआय इंडेक्स नुसार ज्या ज्या रस्त्यांसाठी निधीची गरज होती, त्याचा पाठपुरावा करून कामे मंजूर करून घेण्यात आली. जिल्ह्यात ठिकठिकाणी रस्ते विकासाला चालना देण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यांचे भक्कम जाळे निर्माण होऊन दळणवळणासाठी उत्कृष्ट सुविधा निर्माण होईल व विकासाला गती मिळेल. व्यापक जनहित जोपासण्यासाठी सर्वदूर अनेकविध कामे राबविण्यात येत आहेत. भक्कम पायाभूत सुविधांद्वारे ग्रामीण भागाच्या विकासासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. 

नेर पिंगळाई येथे साठवण बंधारा
मृद व जलसंधारण योजनेत ४० लक्ष रुपये निधीतून नेरपिंगळाई येथे साठवण बंधारा बांधकामाचे व अल्पसंख्याक बहुल क्षेत्र विकास कार्यक्रमात १० लक्ष रूपये निधीतून शेकूमियाँ दर्ग्याच्या सौंदर्यीकरणाच्या कामाचे भूमिपूजनही पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.

 

Web Title: Road network out of 18.23 crore fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.