वनक्षेत्रातील ॠ षी महाराज मंदिराला मिळणार रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 09:55 PM2018-09-05T21:55:04+5:302018-09-05T21:56:16+5:30
तिवसा तालुक्यातील प्राचीन देवस्थान असलेले ॠ षीमहाराज मंदीर हे वनविभागाच्या क्षेत्रात असल्याने या ठिकाणी बांधकामाला प्रतिबंध आहे. त्यामुळे या ठिकाणी २०० मीटर पायरींचा रस्ता करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव निवेदिता चौधरी यांनी केंद्रीय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना केली होती. त्यांनी यासंदर्भात डीएफओंना सूचना दिल्यामुळे शेकडो वर्षांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तिवसा तालुक्यातील प्राचीन देवस्थान असलेले
ॠ षीमहाराज मंदीर हे वनविभागाच्या क्षेत्रात असल्याने या ठिकाणी बांधकामाला प्रतिबंध आहे. त्यामुळे या ठिकाणी २०० मीटर पायरींचा रस्ता करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव निवेदिता चौधरी यांनी केंद्रीय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना केली होती. त्यांनी यासंदर्भात डीएफओंना सूचना दिल्यामुळे शेकडो वर्षांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लागणार आहे.
तिवसा ते रिद्धपूर राज्यमार्गावर तिवसा शहराचाच एक भाग असलेली ॠ षी महाराज टेकडी व तेथील मंदीर हे तिवसावाशियांचे ग्रामदैवत आहे. या टेकडीच्या चारही बाजूला शेतजममीन, मुख्य कालवा असतांना नेमकी ही टेकडी वन विभागाच्या क्षेत्रात येत असल्याने विकासाला वनकायद्याचा प्रतिबंध आहे, या ठिकानी पौष महिण्यात मोठा सप्ताह असतो. या दरम्यान भागवत सप्ताह, हरिनाम सप्ताह, किर्तन आदी धार्मिक कार्यक्रम होतात. या टेकडीवरून गुरूकुंजातील राट्रसंताची समाधी देखील दिसते.सद्यस्थितीत या मंदिराला जाण्यास कोणताही सोईचा रस्ता तसेच पाण्याची सोय नाही. त्यामुळे हजारो भाविकांना पायवाटेने मंदिरात जावे लागते. हा अडचणीचा रस्ता असल्याने निवेदिता चौधरी यांनी ही बाब ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनात आणून दिली. या मंदिरात जाण्यासाठी २०० मीटरपर्यंत पायऱ्यांचा रस्ता व पाण्यासाठी पाईपलार्ईन टाकण्याची परवानगी मिळाल्यास या धार्मिक स्थळाचा विकास होईल.
गावातील युवकांद्वारा या ठिकाणी वृक्षारोपन करता येवून या ठिकाणी पर्यटन वाढेल, अशी ग्वाही निवेदिता चौधरी यांनी ना.मुनगंटीवार यांना दिली असता, अमरावती डीएफओ यांना तपासून कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने लवकरच ही समस्या मार्गी लागणार आहे.
वनकायद्यांमुळे या प्राचीन मंदिरात जाण्यासाठी रस्ता नाही, वीज व पाणी देखील नाही. त्यामुळे हजारो भाविकांना त्रास होत असल्याची बाब ना. मुनगंटीवार यांच्या निदर्शनात आणली असता त्यांनी यासंदर्भात निर्देश दिलेत.
- निवेदिता चौधरी, प्रदेश सचिव, भाजप
यासंदर्भात केंद्रीय वनमंत्र्याचे पत्र प्राप्त झाले. त्याअनुषंगाने मोर्शी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्यात. संबंधित क्षेत्रामधील ग्रामपंचायतीची ना हरकत आदी बाबी यामध्ये राहील.
- अशोक कविटकर, सहा. वनसंरक्षक, अमरावती