२८५ कोटींतून लखलखणार रस्ते

By admin | Published: November 1, 2015 12:18 AM2015-11-01T00:18:07+5:302015-11-01T00:18:07+5:30

सार्वजनिक बांधकाम विभागाव्दारा २८५ कोटी रुपयांच्या निधीतून जिल्ह्यातील रस्त्यांच्या ११८ कामांची सुरुवात करण्यात आली आहे.

Road to travel through 285 crores | २८५ कोटींतून लखलखणार रस्ते

२८५ कोटींतून लखलखणार रस्ते

Next

प्रवीण पोटे : मुंबई, सोलापूरच्या बंद मिल अमरावतीत आणण्याचा प्रयत्न
अमरावती : सार्वजनिक बांधकाम विभागाव्दारा २८५ कोटी रुपयांच्या निधीतून जिल्ह्यातील रस्त्यांच्या ११८ कामांची सुरुवात करण्यात आली आहे. या विकासाच्या वाटा आहेत. तसेच ७५० कि.मी लांबीच्या रस्त्याची दुरुस्तीदेखील करण्यात येत आहे. मागील वर्षी १४८ कोटी रुपयांची तरतूद होती, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी महाराष्ट्र शासनाचे वर्षपूर्तीनिमित्त शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
एमआरजीएसच्या माध्यमातून २५०० पाणंद रस्ते येत्या वर्षभरात पूर्ण करण्यात येणार आहेत. गावागावांतील वाहतुकीचे हे रस्ते म्हणजे शेतकऱ्यांच्या ‘लाईफलाईन’ आहेत. यावर्षी 'टार्गेट आरोयंटेड' काम करण्यात येणार आहे. प्रथमच महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचारी व तलाठ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. कामांविषयक त्यांना शपथ देण्यात आली. शेतकऱ्यांच्या कामांची कुठेही अडवणूक व्हायला नको, असे अधिकाऱ्यांना बजावल्याचे ना. पोटे यांनी सांगितले.
मुंबई व सोलापूर येथे बंद पडलेले एन.टी.सी.च्या मिल नांदगाव पेठ येथील टेक्सटाईल पार्क येथे स्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यात प्रथमच तीन क्लस्टरला मान्यता मिळाली आहे. यामध्ये रेडीमेड गारमेंट क्लस्टर अमरावती येथे हनी प्रोसेसिंग क्लस्टर दर्यापूर तालुक्यामधील शिंगणापूर येथे टिकवूड फर्निचर परतवाडा येथे स्थापित करण्यास मान्यता मिळाली असल्याचे ना. पोटे यांनी सांगितले. नांदगाव पेठ येथील औद्योगिक क्षेत्रामध्ये टेक्सटाईल पार्कचे ८ युनिटची सुरूवात होऊन १५ युनिट येण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये ४ हजार कोटींची गुंतवणूक होणार असून १० हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. तसेच सामान्य सुविधा केंद्र उभारण्याचे काम सुरू असल्याची माहिती ना. पोटे यांनी दिली.
औद्योगिक क्षेत्रातील उद्योग, प्रदूषण विभागामार्फत बंद पडलेले उद्योग ७ दिवसांत कन्सेंट देऊन पूर्ववत सुरू करण्यात आले आहे. लघु व मध्यम उद्योजकांना ५० हजार ते ५ लाखांपर्यंत आर्थिक मदत देऊन उद्योजकांना मशिनरी व प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे ना. प्रवीण पोटे यांनी सांगितले.
पत्रपरिषदेला जिल्हाधिकारी किरण गीत्ते, सीईओ सुनील पाटील, सां.बां. विभागाचे मुख्य अभियंता बनगीरवार उपस्थित होते.

जलयुक्त शिवाराच्या साठ्यातून २२ हजार हेक्टरमध्ये सिंचन

जलयुक्त शिवार हा मुख्यमंत्र्यांच्या महात्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून २०१३१ टीसीएम पाण्याचा साठा निर्माण करण्यात आला. यामाध्यमातून २२ हजार हेक्टर क्षेत्रात सिंचनाची सुविधा निर्माण झाली आहे. १७ हजार सौर ऊर्जा पंपाचे वाटप करण्यात आहे. जिल्ह्याकरिता २०५.८३ कोटींची इन्फ्रा-२ मंजूर. यामध्ये ११ उपकेंद्राचे बांधकाम करण्यात आले.११६३ वितरण रोहित्र व ४८७ वितरण रोहित्र क्षमता वाढ असल्याचे ना. पोटे यांनी सांगितले.

चिखलदरा येथे होणार 'उदंचन' प्रकल्प
चिखलदरा येथे पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने ‘कॅक्टस गार्डन’ साकारत आहे. तसेच उदंचन प्रकल्प सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. सिडकोच्या माध्यमातून पर्यटनाचा विकास करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. पर्यटकांना चिखलदरा दर्शन व्हावे, यासाठी टॉयट्रेन सुरू करण्याचा प्रयत्न आहे. तसेच परिसरातील हवामानाचा लाभ घेऊन शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलण्याच्या दृष्टिकोनातून चिखलदरा क्षेत्रामध्ये स्ट्रॉबेरी पिकाची १२.५ एकरात लागवड करण्यात आली. एकूण ५० शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानात ८० लक्ष रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. आदिवासींचे राहणीमान सुधारावे, यासाठी प्रयत्न असल्याचे ना. पोटे म्हणाले.

‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविणार
जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचाव्यात. प्रत्येक नागरिकांना योजनेचा लाभ मिळावा, त्यांच्या समस्यांचा निपटारा व्हावा, यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये समाजामध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या ३० ते ३२ सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेण्यात येऊन त्याद्वारे जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद साधण्यात येणार आहे. नागरिकांच्या असणाऱ्या समस्या या उपक्रमातून जाणून घेण्यात येईल. शासन स्तरावर त्याचा निपटारा व्हावा, यासाठी आपण स्वत: यात सहभागी असल्याचे ना. प्रवीण पोटे यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Road to travel through 285 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.