रस्ते अन् अधिकारी दोन्ही गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 11:03 PM2017-09-25T23:03:46+5:302017-09-25T23:04:16+5:30

मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात जिल्हा परिषद उपविभागीय स्तराचे कार्यालय ग्रामीण भागातील रस्ते तयार करण्यासाठी यंत्रणा उभारली असताना धारणी व चिखलदरा या दोन्ही आदिवासी तालुक्यातील कामे रखडली आहेत.

Roads and Officers Disappeared | रस्ते अन् अधिकारी दोन्ही गायब

रस्ते अन् अधिकारी दोन्ही गायब

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषदेचे दुर्लक्ष : विकासकामांचे वाजताहेत तीनतेरा, मेळघाटातील वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात जिल्हा परिषद उपविभागीय स्तराचे कार्यालय ग्रामीण भागातील रस्ते तयार करण्यासाठी यंत्रणा उभारली असताना धारणी व चिखलदरा या दोन्ही आदिवासी तालुक्यातील कामे रखडली आहेत. यामागील मुख्य कारण अभियंते व अधिकारी मुख्यालयी न राहता मोठ्या शहरातून मेळघाटचा कारभार पाहत आहेत.
उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंता सहायक यांची पदे येथे तयार करण्यात आली. त्यांचे कार्यालयही निर्माण करण्यात आले. मात्र, या कार्यालयात दोन-तीन कर्मचारी वगळता बहुतांश अधिकारी उपस्थित राहत नसल्याचे चित्र नित्त्याचेच झाले आहे.
जिल्हा परिषदेतर्फे मेळघाटातील अतिदुर्गम भागातील गावखेड्यांचे धारणी मुख्यालयाशी संपर्क व्हावे, यासाठी रस्ते, रपटे व पुलांची जाळे कुपोषणाच्या उद्रेकानंतर १९९५ च्या काळात शासनाने विणले होते. मात्र या रस्त्यांची दुरुस्ती व देखभाल जि.प. बांधकाम विभागाने न करता पुढे पाठ व मागे सपाट असे केल्याने जुने रस्ते बेपत्ता होत चालले आहेत. जुन्या रस्त्यावरील डाबंर दिसेनासे झाले आहे.
जिल्हा परिषद बांधकाम उपविभागातील अभियंते मुख्यालयी उपस्थित राहत नसल्यामुळे येथील विकासकामे कंत्राटदारांच्या मर्जीने होत असून कामाचा बाजेवारा उडत आहे. अवघ्या महिनाभरात डांबरीकरणाचे काम उखडणे, खडीकरणातील मुरुमाचे प्रमाण असल्याने गिट्टी बाहेर येणे, तर रपट्यांची निकृष्ट कामे अभियंत्यांच्या गैरहजेरीत होत असल्याने येथील विकासकामांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसते.
अधिकाºयांच्या हजेरीचा दिवस शुक्रवार
या विभागातील निवडक कर्मचारी वगळता अभियंता वर्ग नेहमीच अमरावती-परतवाडा येथील आपल्या निवासातून काम करीत आहे. केवळ देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी शुक्रवारी एकच दिवस येत असल्याचे या कार्यालयात कामानिमित्त जाणाºया अनेकांनी सांगितले. अशा अभियंत्यांच्या मस्टरची पाहणी करून कार्यवाही करण्याची मागणी जोर धरीत आहे.

Web Title: Roads and Officers Disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.