मेळघाटातील रखडलेले रस्ते, पुलांसाठी केंद्रीय मदतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:09 AM2021-06-22T04:09:48+5:302021-06-22T04:09:48+5:30

ना. गडकरींची पटेल यांनी घेतली भेट, निधीची मागणी परतवाडा : स्वातंत्र्योत्तर काळापासून आजपर्यंत मेळघाटात वीज, पाणी, रस्ता, आरोग्य सुविधांचा ...

Roads in Melghat, need central help for bridges | मेळघाटातील रखडलेले रस्ते, पुलांसाठी केंद्रीय मदतीची गरज

मेळघाटातील रखडलेले रस्ते, पुलांसाठी केंद्रीय मदतीची गरज

Next

ना. गडकरींची पटेल यांनी घेतली भेट, निधीची मागणी

परतवाडा : स्वातंत्र्योत्तर काळापासून आजपर्यंत मेळघाटात वीज, पाणी, रस्ता, आरोग्य सुविधांचा गंभीर प्रश्न निर्माण आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या जाचक अटींमुळे आदिवासींना पायदळ चालणेही कठीण झाले आहे. परिणामी रखडलेले रस्ते आणि पूल व इतर सुविधांसाठी केंद्र शासनाच्या परवानगी व आर्थिक निधीची गरज आहे. त्यासाठी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी केंद्रीय रस्ते, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर निवासस्थानी रविवारी सायंकाळी ६ वाजता भेट घेतली. यात ४५ मिनिटे विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यादरम्यान विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावरील आशिया खंडातील दुसऱ्या स्काय वॉकसंदर्भात निवेदन देऊन हे काम पूर्णत्वास नेण्याची मागणी करण्यात आली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच राज्याचे बांधकाम मंत्री असताना मेळघाटातील प्रत्येक रस्ता, मुख्य मार्गाशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम केले होते. त्यानंतर या रस्त्यांची वीस वर्षांत दैनावस्था झाल्याचे वास्तव आ. राजकुमार पटेल यांनी ना. नितीन गडकरी यांच्यापुढे मांडले. यावेळी त्यांचे स्वीय सहायक प्रवीण तेलगोटे, जगत शनवारे, सुनील भालेराव, रवि सुलाखे, चौरसिया आदी उपस्थित होते.

बॉक्स

व्याघ्र प्रकल्पाच्या जाचक अटी, केंद्राची नियमावली

मेळघाटातील रस्ते केंद्रीय पर्यावरण खात्याच्या परवानगीअभावी रखडले आहेत. मेळघाट विधानसभा क्षेत्रातील व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीतील रस्त्यांची रीतसर परवानगी केंद्रीय विशेषाधिकार पर्यावरण समितीकडून मिळविण्याकरिता प्रयत्न करावे तसेच दुर्गम व अतिदुर्गम भागातील रस्ते व पूल निर्माण करून देण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

बॉक्स

स्काय वॉकचा अडथळा दूर करा

विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळख असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळाच्या विकासाकरिता उपाययोजना करणे तसेच चिखलदऱ्यात निर्माणाधीन आशिया खंडातील दुसऱ्या स्काय वॉकच्या निर्मितीत येत असलेले अडथळे दूर करण्यासंदर्भात निवेदन देत, चर्चा करण्यात आली. येथे जागतिक स्तरावर पर्यटक येणार असल्याने विशेष लक्ष देण्याची विनंती करण्यात आली.

बॉक्स

पर्यावरणमंत्र्यांची बैठक

मेळघाटातील रस्ते, पूल आदी निर्मितीसाठी केंद्रीय पर्यावरण खात्याची परवानगी आवश्यक आहे. केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री प्रकाश जावड़ेकर यांच्याकडे येणाऱ्या दिवसांत रस्ते व पूल निर्मिती परवानगीसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्याची विनंती करण्यात आली. मेळघाटातील बेरोजगार युवकांसाठी उपलब्ध साधनसंपत्ती व आधारित क्लस्टर निर्माण करून मेळघाटातच रोजगाराची संधी निर्माण करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

===Photopath===

210621\img-20210620-wa0118.jpg

===Caption===

ना नितीन गडकरी यांच्याशी मेळघाट समस्या संदर्भात चर्चा करताना आ राजकुमार पटेल

Web Title: Roads in Melghat, need central help for bridges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.