खासदारांच्या गावातीलच रस्ते खराब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 11:30 PM2017-09-16T23:30:34+5:302017-09-16T23:30:49+5:30
प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ व खासदार विकास महात्मे यांचे मूळ गाव असलेल्या वाठोडा शुक्लेश्वर येथील रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. याचा सर्वाधिक फटका येथील शाळकरी विद्यार्थ्यांना बसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाठोडा शुक्लेश्वर : प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ व खासदार विकास महात्मे यांचे मूळ गाव असलेल्या वाठोडा शुक्लेश्वर येथील रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. याचा सर्वाधिक फटका येथील शाळकरी विद्यार्थ्यांना बसत आहे. रस्ते खराब असल्यामुळे चिखल तुडवीत विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत असल्याचे चित्र आहे.
येथील डाहाके विद्यालयापर्यंतचा ३५० मीटर लांबीचा कच्चा रस्ता मागील अनेक वर्षांपासून तुडवीत प्रवास करीत आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर चिखल साचतो. मात्र याकडे स्थानिक प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत आहे. रस्त्यावर पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहने चालविता येत नाहीत.
डाहाके विद्याल्यात इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात. येथे येणारे बहुतांश विद्यार्थी पायी येतात. काही विद्यार्थी सायकलने प्रवास करीत येतात. तर काही विद्यार्थी सायकलने विद्याल्यात येतात. परंतु पावसाळ्यात खराब झालेल्या या रस्त्यावरून ये-जा करताना विद्यार्थी ना त्रास होत आहे. याच रस्त्यावर नागरिक उघड्यांवर शौचास बसतात, याचा सर्वाधिक त्रास शाळेत जाणाºया विद्यार्थिनींना होतो.
या रस्त्याच्या दुरुस्तीकडे जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग, भातकुली पंचायत समिती, स्थानिक आमदार, खासदार व विशेष म्हणजे ज्यांचे मूळ गाव आहे, असे राज्यसभेचे खासदार विकास महात्मे यांचे दुर्लक्ष होत असलेल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी केला आहे.