‘सत्तेतील चोरांच्या टोळ्यांना लुटा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 06:00 AM2019-11-25T06:00:00+5:302019-11-25T06:01:00+5:30
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात रविवारी दुपारी तिवसा पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. आपण निवडणूक जिंकण्यासाठी कसोशीने लढतो. प्रयत्न करणे हे माझे काम आहे. आता तुम्ही ठरवा, असेही ते म्हणाले. निवडणूक काळात आमिष दाखवून मते घेतली जातात.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : एकीकडे सत्तेचा वाटा मिळविण्यासाठी आपण आटापिटा करतोय. भीमा कोरेगावसारखे प्रकरण झाले, तेव्हाच आपण एकत्र येतो. पण सत्तेत येण्यासाठी चोरांच्या ज्या टोळ्या सत्तेत बसल्या आहेत, त्यांना आता लुटा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात रविवारी दुपारी तिवसा पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. आपण निवडणूक जिंकण्यासाठी कसोशीने लढतो. प्रयत्न करणे हे माझे काम आहे. आता तुम्ही ठरवा, असेही ते म्हणाले. निवडणूक काळात आमिष दाखवून मते घेतली जातात. आपण त्याला बळी पडतो. मी तुम्हाला पैसे देतो, तुम्ही ब्राम्हण समाजाची मते विकत घेऊन दाखवा, असे म्हणत स्वत: सुधारण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
पंचायत समितीच्या उमेदवारांना राजकीय टिप्स
चांदूर रेल्वे : गावातील प्रत्येक मतदारांवर आपले लक्ष असले पाहिजे. गावात कायमस्वरूपी राहणारे व बाहेरगावी असणाऱ्या प्रत्येक मतदारांच्या संपर्कात आपण असावे, आपली भूमिका मतदारांपर्यंत कशी पोहोचवायची, याबाबत बाळासाहेब आंबेडकर यांनी पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवारांना राजकीय टिप्स दिल्यात. नीलेश विश्वकर्मा यांच्या जनसंपर्क कार्यालयातील संवाद सत्रात ते बोलत होते. यावेळी नीलेश विश्वकर्मा, वंचितचे जिल्हाध्यक्ष रमेश निकोसे, नंदेश अंबाडकर, निशा शेंडे आदी उपस्थित होते. सभेला पंचायत समिती उमेदवारांसह तालुक्यातील वंचित कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.