रोहित बीयर शॉपी सील
By admin | Published: November 14, 2016 12:12 AM2016-11-14T00:12:51+5:302016-11-14T00:12:51+5:30
राजापेठ येथील रोहित बीअर शॉपी या प्रतिष्ठानावर १,४७,५८६ रुपये स्थानिक संस्था कर (एलबीटी) थकीत होता.
महापालिकेची कारवाई : थकीत एलबीटीचा भरणा
अमरावती : राजापेठ येथील रोहित बीअर शॉपी या प्रतिष्ठानावर १,४७,५८६ रुपये स्थानिक संस्था कर (एलबीटी) थकीत होता. कर वसुली करण्याकरिता रविवारी एलबीटी विभागाने येथे धाड घातली. वसुलीची रक्कम प्राप्त न झाल्याने सदर प्रतिष्ठान सीलबंद करण्यात आले. हे प्रतिष्ठान धारकांकडून कर वसूल होईपर्यंत सदर प्रतिष्ठान सील ठेवण्यात येईल.
होटल मराठा प्राईड, खापर्डे बगीचा व होटल प्रेसिडेंट बार, विद्यापीठ रोड या दोन प्रतिष्ठानांकडून अंदाजे ५.५० लाखांचे एलबीटी कर वसूल करण्यात आले.
यावेळी अधिकारी सुनील पकडे, अरविंद पाटील त्यांचेसोबतनिरीक्षक कमल देसाई व रितेश देसाई आणि शिपाई प्रदीप झंझाड उपस्थित होते. याशिवाय शनिवारी राजेश जैयस्वाल व टी. बी. जयस्वाल यांच्या विदेशी व देशीदारू दुकानावर १७.५७ लाख रुपयांच्या थकीत एलबीटीसाठी धाड घालण्यात आली. मात्र सुनील जयस्वाल यांनी कारवाईला विरोध केला. बडनेरा पोलिसांना पाचारण केल्यानंतर त्यांनी थकीत रकमेचे धनादेश दिले. एव्हरेस्ट कंट्री लिकर्स, कडबीबाजार यांनी सुद्धा एलबीटीची थकीत रक्कम भरली. (प्रतिनिधी)