घुईखेडमध्ये अनेकांच्या घरावरील छप्पर उडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 01:25 AM2019-06-10T01:25:23+5:302019-06-10T01:25:47+5:30
चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथे शनिवारी सायंकाळी ५.३० ते ६ या वेळेत केवळ अर्धा तास आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे अनेकांच्या घराचे छप्पर उडाले असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे. पावसानेसुद्धा हजेरी लावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
घुईखेड: चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथे शनिवारी सायंकाळी ५.३० ते ६ या वेळेत केवळ अर्धा तास आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे अनेकांच्या घराचे छप्पर उडाले असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे. पावसानेसुद्धा हजेरी लावली.
दोन दिवसांपूर्वीच चांदूर रेल्वे तालुक्यात वाऱ्यामुळे अनेकांच्या घरांचे नुकसान झाले होते. यानंतर पुन्हा शनिवारी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. घुईखेडमधील मारुती गायधने, अमोल पंजाब खंडारे, अशोक शिंदे, रमेश सहारे, धीरज नेवारे, साजीर खान, गजानन शहाळे, ईश्वर बोंदरे, दिनेश सिंगलवार, विनय गोटफोडे, गजानन फिस्के, जनार्दन लोखंडे, हरिदास गोंडाणे, डॉ बैस्कार, सुनील नरगडे, पुंडलिक बावणे, उद्धव भोयर, मधुकर भोयर, नाईक, मारबदे, शंकरराव नवघरे, पद्माकर गजघाटे, नरेंद्र गावंडे यांच्यासह अनेकांच्या घरावरील टिने उडाली आहे.
वादळामुळे विजेचे काही खांब वाकले असून, विद्युत तारा लटकल्या आहेत. या तारांच्या घर्षणातून स्पार्किंग व आगीचे लोळ उठण्याचा धोका असल्याची भीती घुईखेड येथील गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शनिवारी भारनियमनामुळे सकाळी ६.३० वाजता वीजपुरवठा गूल झाला होता. त्यानंतर काही वीजविषयक कामे करण्यात आली. यानंतर सायंकाळच्या वादळामुळे रात्रीपर्यंत वीजपुरवठा सुरू झालेला नव्हता. त्यामुळे घुईखेड गाव अंधारात होते.