रोप स्किपिंग : स्कॉलर्स कॉन्व्हेंटचे विद्यार्थी आतंरराष्ट्रीय स्तरावर खेळणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 11:00 PM2019-10-30T23:00:09+5:302019-10-30T23:01:23+5:30

भोपाळ येथे नुकत्याच पार पडलेल्या रोप स्किपिंग स्पर्धेत स्कॉलर्स कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन करून १३ पदकांची कमाई केली.

Rope Skipping: Students from Scholars Convent will play at the international level | रोप स्किपिंग : स्कॉलर्स कॉन्व्हेंटचे विद्यार्थी आतंरराष्ट्रीय स्तरावर खेळणार 

रोप स्किपिंग : स्कॉलर्स कॉन्व्हेंटचे विद्यार्थी आतंरराष्ट्रीय स्तरावर खेळणार 

googlenewsNext

अमरावती : भोपाळ येथे नुकत्याच पार पडलेल्या रोप स्किपिंग स्पर्धेत स्कॉलर्स कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन करून १३ पदकांची कमाई केली. याच बेसवर अमेरिकेत होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांना खेळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

इंडियन रोप स्किपिंग फेडरेशनतर्फे भोपाळ येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेत अमरावती येथील स्कॉलर्स कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी बजावली. यामध्ये के.जी. १ च्या घाटोळे याने दोन सुवर्ण व १ कांस्य पदक पटकाविले. इयत्ता पाचवीच्या रुद्राक्ष घाटोळे याने सुवर्ण व कांस्य पदक, इयत्ता आठवीचा इशान राजे याने दोन सुवर्ण व १ कांस्य पदक अशा एकूण १३ पदके स्कॉलर्स कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी पटकावून अमरावतीची मान उंचावली. त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय रोप स्किपिंग स्पर्धेत खेळण्याची संधी त्यांना मिळणार असल्याची माहिती क्रीडा शिक्षक नीलेश उमाळे यांनी दिली. संस्थाध्यक्ष सविता भोंगाडे, सचिव अमित भोंगाडे, मुख्याध्यापक साधना वागमारे व सर्व शिक्षकांनी त्यांचे कौतुक करून त्यांना अमेरिकेत होणाºया रोप स्किपिंग स्पर्धेत खेळण्यासाठी शुभेच्छा दिल्यात.

Web Title: Rope Skipping: Students from Scholars Convent will play at the international level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.