बोंडअळीमुळे त्रस्त शेतक-याने उभ्या कपाशीवर फिरविला रोटाव्हेटर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2017 10:36 PM2017-11-04T22:36:23+5:302017-11-06T10:03:52+5:30
कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे हाती येणारे उत्पन्न गेले. यामुळे हवालदिल झालेल्या शेतकºयाने चक्क तीन एकरातील कपाशीवर रोटाव्हेटर चालविले
वीरेंद्रकुमार जोगी
अमरावती - कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे हाती येणारे उत्पन्न गेले. यामुळे हवालदिल झालेल्या शेतकºयाने चक्क तीन एकरातील कपाशीवर रोटाव्हेटर चालविले. चांदूर रेल्वे तालुक्यातील येरड बाजार येथील शेतकरी राजेंद्र देशमुख यांनी बीटी बियाणे नसल्याचा आरोप करीत गुन्हे कंपनीवर गुन्हे नोंदविण्यात यावे अशी मागणी केली आहे.
राजेंद्र देशमुख यांनी आपल्या पाच एकर शेतात ‘मोक्ष’ या आदित्य कंपनीच्या वाणाची पेरणी केली. पिकांची चांगल्या पद्धतीने मशागत केली. त्यांची पºहाटीही चांगली आली. पात्याही आल्या. कपाशीच्या झाडाला १०० ते १२० बोडे धरू लागली होती. मात्र, बोंड धरीत असताना त्यावर गुलाबी बोंड अळी (पिंक ब्लो) चा प्रादुर्भाव झाला. झाडावरील ९० टक्के बोंडांवर अळी आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हे बियाणे नॉन बीटी असल्याचे तक्रार शेतकºयाने तालुका कृषी अधिकाºयांकडे केली. त्यानुसार कृषी अधिकाºयांनी पाहणी केली. अनेकांशी चर्चा केल्यावर या कपाशीपासून आता उत्पन्न होणार नाही असा अंदाज आल्याने राजेंद्र यांनी चक्क रोटाव्हेटर फिरवून तीन एकरातील कपाशीवर रोटाव्हेटर चालविण्या निर्णय घेतला. यामुळे त्यांचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले आहे.
३५ हजारांचा खर्च, उत्पन्न शुण्य
शेतकरी राजेंद्र यांनी पाच एकरात लावलेल्या कपाशीसाठी सुमारे ३५ हजारांचा खर्च केला. बियाणे, खत, किटकनाशक, मजुरी याचा यात समावेश आहे. मागील अनेक वर्षांपासून ते कपाशीचे उत्पादन घेत असून एकरी २० क्विंटलपर्यंत त्यांनी उत्पादन घेतले आहे. यंदा त्यांना पेरणी केल्यानंतर एकाही छदाम हाती लागला नाही.
बीटीच्या नावाने बियाणे विकणाºया कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. शेतकरी दिवस रात्र मेहनत करतो, मात्र हाती काहीच येत नसेल तर आत्महत्येशिवाय कोणताही पर्याय उरत नाही. अशा संकट अस्मानी नव्हे तर सुल्तानी आहे.
- राजेंद्र देशमुख, शेतकरी, येरड बाजार, चांदूर रेल्वे