३० एकरांतील सोयाबीनवर फिरविला ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 08:27 PM2019-07-27T20:27:12+5:302019-07-27T20:27:23+5:30

पावसाअभावी हे सोयाबीन वाळले होते. त्यामुळे दुबार पेरणीकरिता कृषी विभागाच्या सर्वेक्षणाविनाच या शेतक-याने पीक मोडून काढले. 

Rotated tractor on 2 acres of beans | ३० एकरांतील सोयाबीनवर फिरविला ट्रॅक्टर

३० एकरांतील सोयाबीनवर फिरविला ट्रॅक्टर

googlenewsNext

टाकरखेडा संभू (अमरावती) : पेरणीनंतर पावसाने दांडी मारल्याने चांदूरबाजार तालुक्यातील लसनापूर येथील एका शेतकºयाला ३० एकर सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवावा लागला. पावसाअभावी हे सोयाबीन वाळले होते. त्यामुळे दुबार पेरणीकरिता कृषी विभागाच्या सर्वेक्षणाविनाच या शेतक-याने पीक मोडून काढले. 
मान्सूनच्या सुरुवातीपासूनच पाऊस उशिरा पडला. त्यामुळे उशिरा पेरणी सुरू झाली. परंतु, पेरणीनंतर पावसाने दांडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाला. भातकुली व चांदूरबाजार तालुक्यात भीषण परिस्थिती असल्याने लसनापूर येथील आकाश खुरद या शेतकºयाने ३० एकरांतील सोयाबीन मोडले. त्यांनी ३ जुलै रोजी पेरणी केली होती. याकरिता अंदाजे एक लाख रुपये खर्च आला होता. 
पावसाच्या प्रतीक्षेत सोयाबीनची वर आलेली पिके वाळू लागली होती. त्यामुळे येणाºया पावसाचाही आता काहीच उपयोग झाला नसता. अखेर सदर शेतक-याने ३० एकरावरील सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरविला. यापूर्वी त्यांनी परिसरातील कृषी सहायकालादेखील माहिती दिली होती. परंतु, सर्वेक्षणासंदर्भातील कोणत्याच प्रकारचे आदेश नसल्याचे सांगून त्यांनी हात वर केले. त्यामुळे अखेर या शेतकºयाने पिकावर ट्रॅक्टर फिरविले. 

कृषी विभागाचे सर्वेक्षण नाही 
जिल्हास्तरावरून तालुका कृषी अधिकाºयांना पीक स्थितीसंदर्भातील अहवाल मागितला आहे. परंतु, लसनापूर शिवारात कोणतीही पाहणी वा सर्वेक्षण झालेले नाही.

Web Title: Rotated tractor on 2 acres of beans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.