अंजनगाव मार्गावर वाहनाने दोघांना उडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 01:20 AM2019-02-22T01:20:33+5:302019-02-22T01:21:38+5:30
अकोलाकडे जाणाऱ्या मार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारांना उडवल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजता घडली. यात दोघे गंभीर जखमी झाले. याच रस्त्यावर निर्माणाधीन पुलाच्या लोखंडी सळाखीला एका अज्ञात इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अकोलाकडे जाणाऱ्या मार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारांना उडवल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजता घडली. यात दोघे गंभीर जखमी झाले. याच रस्त्यावर निर्माणाधीन पुलाच्या लोखंडी सळाखीला एका अज्ञात इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
विनायक काजे (६५, लाखनवाडी) व श्यामराव रामू पानसे (३५, रा. पलासखेडी) असे गंभीर जखमींची नावे आहेत. दोघेही एमएच २७-२३१८ या क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. दोघेही रस्त्याच्या कडेला फेकले गेले. सावळी येथील प्यारेलाल प्रजापती व अमोल कथे यांनी दोन्ही जखमींना एका वाहनात उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात पाठविले.
जखमींचे विव्हळणे अन् माणुसकीला काळिमा
अज्ञात वाहनाच्या धडकेनंतर दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडून होते. नागरिकांनी रस्त्याने ये-जा करणाºया अनेक वाहनांना हात दाखवला. मात्र, कुणीच थांबायला तयार नव्हते. अखेर एका चालकाने थांबून माणुसकीचा परिचय दिला. त्याच्या वाहनातून जखमींना रुग्णालयात नेण्यात आले.