शहर पोलिसांचे रुटमार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:14 AM2021-04-20T04:14:05+5:302021-04-20T04:14:05+5:30
अमरावती : लॉकडाऊन व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी रस्त्यावर फिरु नये, तसेच होऊ घातलेली महावीर जयंती, राम ...
अमरावती : लॉकडाऊन व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी रस्त्यावर फिरु नये, तसेच होऊ घातलेली महावीर जयंती, राम नवमी, हनुमान जयंती आणि इतर सणाच्या अनुषंगाने शहरात कायदा व सुव्यवस्था राहावी, याकरिता शहर पोलिसांनी सोमवारी सिटी कोतवाली ठाण्याच्या हद्दीतील इतरवारा बाजार परिसरात, तर गाडगेनगर ठाणे हद्दीतील सिंधी कॅम्प, रामपुरी कॅम्प व पंचवटी चौकात रूटमार्च (पथसंचलन) केले. यावेळी शेकडो पोलीस व अधिकारी रस्त्यावर उतरले होते. सदर पथसंचलनाला पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) विक्रम साळी, पोलीस उपआयुक्त शशिकांत सातव, एसीपी शिवाजी धुमाळ, गाडगेनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले, पीआय मोहन कदम, विजय यादव सिटी कोतवालीचे वरिष्ठ पोलीस राहुल आठवले, निरीक्षक पीआय विवेकानंद राऊत तसेच संबंधीत एपीआय, पीएसआय व संबंधीत ठाण्याचे पोलीस कर्मचारी, क्युआरटी व आरसीपी पथक तैनात करण्यात आले होते.