आरटीईची प्रवेश प्रक्रिया लॉकडाऊनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:13 AM2021-05-21T04:13:29+5:302021-05-21T04:13:29+5:30
अमरावती : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमनुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. त्यात ...
अमरावती : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमनुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. त्यात प्रवेशासाठी दिलेल्या मुदतीत जिल्ह्यातील ५ हजार ९१८ पालकांनी अर्ज केले होते. यातील १,९८० विद्यार्थ्यांची सोडतीत निवड झाली. निवड प्रक्रिया पूर्ण होऊन एक महिना पूर्ण झाला. मात्र, अद्याप प्रवेशासाठी सूचना ना आल्या ना एकही प्रवेश झाला. सन २०१३-१४ पासून सुरू केलेल्या आरटीई प्रवेशासाठी पालकांमध्ये जनजागृती करावी लागत होती. पालकांमध्ये जनजागृती झाल्याने यंदा जिल्ह्यात २,०७६ जागांसाठी सुमारे ५,९१८ अर्ज आलेत. त्यापैकी १ हजार ९८० विद्यार्थ्यांची नावे सोडतीव्दारे प्रवेशासाठी काढण्यात आली. परंतु पुढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर न केल्यामुळे अद्याप प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. यामुळे प्रवेशास पात्र ठरलेले पाल्यांच्या प्रवेशाची पालकांना प्रतीक्षा लागलेली आहे. जिल्ह्यात यावर्षी २४४ शाळांनी आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केली. त्यानुसार जिल्ह्यातील या शाळांमध्ये २५ टक्क्याप्रमाणे २,०७६ जागा उपलब्ध झाल्या होत्या. त्यापैकी १,९८० विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले आहेत.
बॉक्स
कोरोनामुळे प्रक्रिया लांबणीवर
दोन महिन्यांपासून कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, सर्वत्र लाॅकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे प्रवेशाची प्रक्रियाही लांबणीवर पडली आहे. कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्यानंतरच आरटीई प्रवेश प्रक्रियेला मुहूर्त निघण्याची शक्यता आहे. तोपर्यंत पालकांना मात्र प्रतीक्षा करावी लागणार आहे.