आरटीईची प्रवेश प्रक्रिया पुन्हा लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:11 AM2021-06-04T04:11:02+5:302021-06-04T04:11:02+5:30
अमरावती : आरटीई प्रवेशाची सोडत काढून महिन्याचा कालावधी लोटून गेला आहे. लाॅकडाऊन लागल्याने प्रवेशाची पुढील प्रक्रिया अद्याप ...
अमरावती : आरटीई प्रवेशाची सोडत काढून महिन्याचा कालावधी लोटून गेला आहे. लाॅकडाऊन लागल्याने प्रवेशाची पुढील प्रक्रिया अद्याप होऊ शकली नाही. ३० एप्रिलपर्यंत असलेले लॉकडाऊन पुन्हा १५ दिवस वाढविल्याने पालकांना प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर किमान मे महिन्यात प्रवेशाची प्रक्रिया होईल, अशी अपेक्षा होती. मात्र अद्याप प्रवेश प्रक्रिया सुरू न झाल्याने शिक्षण विभागात पालकांकडून आरटीई प्रवेशास पात्र ठरलेल्यांकडून प्रवेश प्रक्रिया निश्चीती कधी, अशी विचारणा होत आहे.
यंदा जिल्ह्यात २४४ शाळांमध्ये २ हजार ७६ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी ५९१८ पालकांनी अर्ज केले होते. शिक्षण विभागामार्फत ऑनलाइन सोडतीची प्रक्रिया ७ एप्रिल रोजी पार पडली. सोडतीव्दारे निश्चित झालेल्या जिल्ह्यातील १९८० मुलांच्या पालकांना १५ एप्रिलपासून मेसेजेस पाठविण्यात आले. प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्राप्त मेसेज नुसार कागदपत्रे पडताळणी व प्रवेश याबाबतची कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले होते. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आल्याने. प्रवेशासाठी पात्र ठरल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या.