‘आरटीओ’ला विभागात मिळाली सहा ‘इंटरसेप्टर व्हेईकल्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:13 AM2021-09-03T04:13:48+5:302021-09-03T04:13:48+5:30

अमरावती : रस्त्यावरील वाहनांचे स्पीड पूर्वी पोलीस विभाग स्पीडगन वाहनातून मोजून कारवाई करीत होता. मात्र आता पोलिसांप्रमाणे आरटीओलासुद्धा विभागात ...

RTO gets six interceptor vehicles | ‘आरटीओ’ला विभागात मिळाली सहा ‘इंटरसेप्टर व्हेईकल्स’

‘आरटीओ’ला विभागात मिळाली सहा ‘इंटरसेप्टर व्हेईकल्स’

Next

अमरावती : रस्त्यावरील वाहनांचे स्पीड पूर्वी पोलीस विभाग स्पीडगन वाहनातून मोजून कारवाई करीत होता. मात्र आता पोलिसांप्रमाणे आरटीओलासुद्धा विभागात सहा अत्याधुनिक ‘इंटरसेप्टर व्हेईकल्स’ वाहने मिळाली आहेत. त्यांपैकी दोन वाहने अमरावतीला मिळाली असून आरटीओ रामभाऊ गिते यांच्या हस्ते गुरुवारी या वाहनांचे पूजन करून प्रारंभ करण्यात आला.

अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ आरटीओला प्रत्येकी एक इंटरसेप्टर व्हेईकल, तर अमरावतीला दोन वाहने प्राप्त झाली आहे. ही वाहने आता जिल्हाभर फिरून राष्ट्रीय महामार्ग, प्रमुख व राज्य महामार्गावर उभी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भरधाव वाहनांना टिपून त्यांच्यावर ऑनलाईन कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

प्रारंभाप्रसंगी प्रादेशिक परिवहन अधिकारी रामभाऊ गिते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राज बागरी, एआरटीओ प्रशांत देशमुख, एआरटीओ सिद्धार्थ ठोके, मोटार वाहन निरीक्षक गुल्हाणे यांच्यासह इतर मोटार वाहन निरीक्षकांची उपस्थिती होती.

Web Title: RTO gets six interceptor vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.