आरटीओच्या भरारी पथकाची २,४८८ वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:16 AM2021-08-23T04:16:08+5:302021-08-23T04:16:08+5:30
(कॉमन) अमरावती : आरटीओच्या भरारी पथकाने विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये २८८८ वाहनांवर कारवाई केली. दंड व कर, असा एकूण ३७७.३६ ...
(कॉमन)
अमरावती : आरटीओच्या भरारी पथकाने विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये २८८८ वाहनांवर कारवाई केली. दंड व कर, असा एकूण ३७७.३६ लाखांचा महसूल आरटीओने वाहनचालकांकडून वसूल केला आहे. ही कारवाई एप्रिल ते जुलै या चार महिन्यात करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी रामभाऊ गिते यांनी दिली.
आरटीओला पाचही जिल्ह्यत वर्षभरात १०८६ लाखांचे उद्दिष्ट आरटीओला देण्यात आले होते. त्यापैकी चार महिन्यात दिलेले ३६२ लाखांच्या उद्दिष्टापैकी २७६.१८ लाखांचे उत्पन्न आरटीओला मिळाले. दंड व वाहनांवर टॅक्स असा एकूण ३७७.३६ लाखांची आरटीओने महसूलपोटी वसुली केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोनामुळे गत वर्षीच्या तुलनेत निम्मे टार्गेट पूर्ण झाले असले तरी कोरोनातील हे चांगले उत्पन्न असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्हा वाहन कारवाई महसूल ( लाखात)
अमरावती ५४३ १२३.४३
बुलडाणा ५०१ ६०.२५
यवतमाळ ६१४ ५४.५
अकोला ३५१ ७२.६९
वाशिम ४७९ ६६.४९
एकूण २४८८ ३७७.३६