‘आरटीओ’ला विभागात मिळाली सहा ‘इंटरसेप्टर व्हेईकल्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:16 AM2021-09-06T04:16:51+5:302021-09-06T04:16:51+5:30

(फोटो ) अमरावती/ संदीप मानकर रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांचा वेग पूर्वी पोलीस विभाग स्पिडगण वाहनातून मोजून कारवाई करीत होता. मात्र, ...

The RTO received six interceptor vehicles in the department | ‘आरटीओ’ला विभागात मिळाली सहा ‘इंटरसेप्टर व्हेईकल्स

‘आरटीओ’ला विभागात मिळाली सहा ‘इंटरसेप्टर व्हेईकल्स

Next

(फोटो )

अमरावती/ संदीप मानकर

रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांचा वेग पूर्वी पोलीस विभाग स्पिडगण वाहनातून मोजून कारवाई करीत होता. मात्र, आता पोलिसांप्रमाणे आरटीओलासुद्धा विभागात सहा अत्याधुनिक ‘इंटरसेप्टर व्हेईकल्स’ वाहने मिळाली आहेत. त्यांपैकी दोन वाहने अमरावतीत असून आरटीओ रामभाऊ गिते यांच्या हस्ते गुरुवारी त्या वाहनांचे पूजन करण्यात आला.

अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ आरटीओला प्रत्येकी एक इंटरसेप्टर व्हेईकल, तर अमरावतीला दोन वाहने प्राप्त झाली आहे. ही वाहने आता जिल्हाभर फिरून राष्ट्रीय महामार्ग, प्रमुख व राज्य महामार्गावर उभी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भरधाव वाहनांना टिपून त्यांच्यावर ऑनलाईन कारवाईचा बडगा उगारणार आहे.

प्रारंभाप्रसंगी प्रादेशिक परिवहन अधिकारी रामभाऊ गिते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राज बागरी, एआरटीओ प्रशांत देशमुख, एआरटीओ सिद्धार्थ ठोके, मोटार वाहन निरीक्षक गुल्हाणे यांच्यासह इतर मोटार वाहन निरीक्षकांची उपस्थिती होती.

Web Title: The RTO received six interceptor vehicles in the department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.