वन्यजीव विभागात रन फॉर फ्रीडम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:16 AM2021-09-05T04:16:54+5:302021-09-05T04:16:54+5:30
परतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागातील सेमाडोह येथे रविवारी रन फॉर फ्रीडम या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले ...
परतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागातील सेमाडोह येथे रविवारी रन फॉर फ्रीडम या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ४५ वर्षांवरील कर्मचाऱ्यांनी पाच किमी अंतराच्या दौडीत सहभाग घेतला. नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
व्याघ्र प्रकल्पच्या वन्यजीव विभागातील पुरुष आणि महिला अशा २३ वनकर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेची सुरुवात राज्य महामार्गावरील भोपळा नाला पूल येथून करण्यात आली. स्पर्धेत पुरुष गटामध्ये प्रथम क्रमांक किसन ऊईके (हतरू वनपरिक्षेत्र), द्वितीय क्रमांक प्रदीप तळखंडकर (वनपाल, फिरते पथक सेमाडोह वनपरिक्षेत्र), तृतीय क्रमांक रावजी अखंडे (वनरक्षक, जारिदा वनपरिक्षेत्र) यांनी पटकावला. एकमेव सहभागी महिला स्पर्धक एस.व्ही. ओरोकार यांनी प्रथम क्रमांक मिळवला. विजेत्यांना प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरण मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प जयोती बॅनर्जी, उपवनसंरक्षक (चिखलदरा) गुगामल निरंजन विवरेकर, सिपना डीसीएफ अविनाश कुमार, अमरावती डीसीएफ चंद्रशेखरन बाला, उपवनसंरक्षक तथा परीविक्षाधीन डीसीएफ मधुमिता एस., सहायक वनसंरक्षक कमलेश पाटील, आरएफओ सम्राट मेश्राम, पी.व्ही. बाळापुरे, वनरक्षक पी.जी. नाटकर, जी.एच. धांडे, एच.एस. देशमुख, खवास, ए.ए. गोफणे, पी.पी. कुलट, अलोकार आदी उपस्थित होते.