लसीकरणासाठी गावांकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:12 AM2021-05-08T04:12:51+5:302021-05-08T04:12:51+5:30
कोरोना प्रतिबंधक लस ही मे महिन्यापासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना देण्यास सुरुवात झाली. लस ...
कोरोना प्रतिबंधक लस ही मे महिन्यापासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना देण्यास सुरुवात झाली. लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. त्यासाठी ठरावीक वेळेत ऑनलाइन स्लॉट सुरू होत असल्याने काही मिनिटांत शहरातील लस केंद्राचा कोटा फुल्ल होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लस केंद्राकडे शहरी मंडळींनी मोर्चा वळवला. ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. लसीकरणासाठी संबंधित व्यक्तीस केंद्र निवडण्याची मुभा आहे. त्यामुळे अनेकजण गर्दीत जाण्यापेक्षा ग्रामीण भागात गर्दी कमी राहते. त्यामुळे शहराऐवजी गावाकडेच लसीकरण करून घेण्यास प्राधान्य देत आहेत. परिणामी आता शहरापाठोपाठ ग्रामीण भागात लसीकरणासाठी वाढलेल्या गर्दीमुळे काही लस केंद्रावर गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे.
कोट
कोरोना प्रतिबंधक लस ही कोणीही कोठेही जाऊन घेऊ शकतात. यासाठी नोंदणी करताना संबंधितास केंद्र नोंदवावे लागते. कोविन संकेत स्थळ हे केंद्राने तयार केले आहे. त्यामुळे शहरातील व्यक्ती ग्रामीण भागात जाऊन लस घेऊ शकतात.
- दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी