धावत्या एसटीच्या चाकाचे निघाले नट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 11:25 PM2017-12-02T23:25:46+5:302017-12-02T23:26:17+5:30

भंगार गाड्यांचे आगार म्हणून सर्वत्र परिचित झालेल्या परतवाडा आगारातील नादुरुस्त बसगाड्या मेळघाटात पाठविल्या जात आहेत.

Running away from the running steam! | धावत्या एसटीच्या चाकाचे निघाले नट!

धावत्या एसटीच्या चाकाचे निघाले नट!

Next
ठळक मुद्देघटांगनजीक घटना : १५ प्रवासी बचावले; परतवाडा आगाराच्या भंगार बस

आॅनलाईन लोकमत
परतवाडा : भंगार गाड्यांचे आगार म्हणून सर्वत्र परिचित झालेल्या परतवाडा आगारातील नादुरुस्त बसगाड्या मेळघाटात पाठविल्या जात आहेत. शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता १५ प्रवाशांना घेऊन येणाºया बसच्या मागील चाकाचे नट निघाले. प्रवाशांनी आरडाओरड करून चालकाला सांगातच बस थांबली आणि धक्कादायक प्रकार घटांग घाटात उघडकीस आला.
परतवाडा आगाराची एमएच ४०-८५१५ क्रमांकाची बस सकाळी ९ वाजता शेड्यूल क्रमांक ९३ रुईपठारसाठी पाठविण्यात आली होती. सायंकाळी ४ वाजता परतीच्या प्रवासात घटांगनजीकच्या घाटवळणात बसगाडीत आवाज येण्यासह मागचा भाग अचानक हलू लागल्याने प्रवाशांनी ओरडायला सुरुवात केली. चालक अतुल निराळे यांनी समयसूचकतेचा परिचय देत बस थांबविली आणि मागील चाकांची तपासणी केली. तीन नट निखळून पडल्याचे दिसताच त्यांना धक्का बसला. उर्वरित नट व्यवस्थित लावून त्यांनी आगारापर्यंत बस आणली.
पहाडावर... कधी शेतात!
परतवाडा-अमरावती राज्य महामार्गावर नादुरुस्त बस रस्त्यावर उभ्या दिसतात. प्रवाशांना पैसे देऊनही दुसºया बससाठी ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे चित्र नेहमीचे आहे. दुसरीकडे चिखलदरा आणि धारणी भागातील दुर्गम भागात पाठविल्या जाणाºया बससुद्धा नादुरुस्त असल्याने स्वत:सह प्रवाशांचा जीव वाचविण्याची कसरत चालकांना करावी लागते. शेतात गेलेली बसगाडी व धामणगाव गढी शिवमंदिराजवळ झालेले निकामी ब्रेकच्या घटना ताज्या असताना आगाराची हेकेखोरी जिवावर बेतणारी आहे.

रुईपठारवरून परत येणाºया बसच्या मागील चाकाच्या एक्सलमध्ये बिघाड आल्याने आॅइल निघाले होते. पूर्ण पार्ट नवे टाकण्यात आले आहेत.
- अनिकेत बल्लाळ, आगारप्रमुख

Web Title: Running away from the running steam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.