पाच रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 10:03 PM2019-02-05T22:03:57+5:302019-02-05T22:04:10+5:30
शहरात पाच रुपयांच्या नोटांचे चलन बंद झाल्याची स्थिती निर्माण झाली होती. ‘लोकमत’ने हा मुद्दा लोकदरबारी मांडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनीही नोट ेस्वीकारण्याबाबत आदेश निर्गमित केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात पाच रुपयांच्या नोटांचे चलन बंद झाल्याची स्थिती निर्माण झाली होती. ‘लोकमत’ने हा मुद्दा लोकदरबारी मांडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनीही नोट ेस्वीकारण्याबाबत आदेश निर्गमित केले. त्यामुळे पाच रुपयांची नोट चलनात असल्याचा विश्वास नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झाला. आता पाच रुपयांच्या नोट चालू लागल्या, असे म्हणायला काही हरकत नसल्याचे दिसून येत आहे.
अमरावती शहरातील बहुतांश छोटे तथा मोठ्या व्यावसायिकांनी पाच रुपयांची नोट स्वीकारणे बंदच केले होते. जुन्या पाच रुपयांच्या काही नोटा जीर्ण झाल्यामुळे अनेक जण ती नोट नाकारू लागले होते. त्यातच चांगल्या पाच रुपयांच्या नोटाही स्वीकारणे नागरिक व व्यावसायिकांनी बंद केले. चलनात असलेल्या नोटा स्वीकारल्या जात नसल्यामुळे अनेकांजवळ पाच रुपयांच्या नोटांचा खच जमा झाला. त्यात पाच रुपयांची नोटा घेत नसल्यामुळे अनेक जण त्रस्त झाले होते. ‘पाच रुपयांच्या नोटांची अघोषित बंदी’ या मधळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच, अनेकांच्या भुवया उंचावल्या. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर अनेकांनी विश्वासाने पाच रुपयांची नोट स्वीकारणे सुरु केले. त्यातच या वृत्ताची दखल अमरावतीचे जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी घेतली. त्यांनी अग्रणी बॅकेला परिपत्रक काढून सर्व बँकांना सूचना देण्यास सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनीही पाच रुपयांच्या नोटा स्वीकारण्याचे नागरिकांना आवाहन केले. ‘लोकमत’चे वृत्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना पाहता, आता शहरात पाच रुपयांच्या नोटा स्वीकारणे सुरु झाले आहे.
पाच रुपयांच्या नोटा चलनात आहेत. यासंबंधी अग्रणी बॅकेकडून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. याशिवाय बँकानाही कळविण्यात आले आहे. नागरिक व व्यापाऱ्यांनी पाच रुपयांची नोट स्वीकारावी.
- जितेंद्र झा,
व्यवस्थापक, अग्रणी बॅक.