ग्रामीण भागात ९ दिवसांत ४३९ आढळले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:13 AM2021-02-12T04:13:24+5:302021-02-12T04:13:24+5:30

अमरावती : कोरोना विषाणूचा संसर्ग काही दिवसांपासून वाढत आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांत १ ते ९ फेब्रुवारीपर्यंत २ हजार ३२६ ...

In rural areas, 439 corona positive patients were found in 9 days | ग्रामीण भागात ९ दिवसांत ४३९ आढळले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

ग्रामीण भागात ९ दिवसांत ४३९ आढळले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Next

अमरावती : कोरोना विषाणूचा संसर्ग काही दिवसांपासून वाढत आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांत १ ते ९ फेब्रुवारीपर्यंत २ हजार ३२६ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. यात ४३९ कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले. यात अचलपूर तालुक्यात सर्वाधिक १७७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची नोंद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या अहवालात नमूद आहे.

गत सप्टेंबर महिन्यापर्यंत जिल्हाभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला होता. त्यानंतर साधारणत: ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत कोरोनाबाधितांचे प्रमाण बरेच कमी झाले. अशातच आता नव्या वर्षात जानेवारीच्या सुरुवातीला कमी असलेले पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण फेब्रुवारीत मात्र जोमाने वाढत आहे. झेडपी आरोग्य विभागाकडील अहवालानुसार १ ते ३१ जानेवारीपर्यंत १४ तालुक्यांत ११ हजार ५०३ नागरिकांच्या काेरोना चाचण्या घेण्यात आल्या होत्या. यात ७११ कोरोना संक्रमित आढळून आले होते. यातील ४९ रुग्ण ॲक्टिव्ह होते, तर ६५४ जणांनी कोरोनावर मात केली. याशिवाय याच महिन्यात ८ जणांचे कोरोनामुळे निधन झाले. अशातच आता १ ते ९ फेब्रुवारीपर्यंत १४ तालुक्यांत २३२६ नागरिकांच्या काेरोना चाचण्यांत ४३९ जण बाधित आढळून आले. यातील ४१५ ॲक्टिव्ह आहेत, तर २१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. याच कालावधीत ३ जणांचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद आहे.

बॉक्स

१ ते ९ फेब्रुवारीची तालुकानिहाय आकडेवारी

तालुका नमुने रुग्णसंख्या दाखल कोरोनामुक्त मृत्यू

अमरावती ११२ १८ १७ ०१ ००

भातकुली ४९ ०९ ०० ०० ००

मोशी १४८ ३३ ३२ ०१ ००

वरूड १६७ २३ २३ ०० ००

अंजनगाव १८८ २८ २६ ०१ ०१

अचलपूर ५१८ १७७ १६८ ०८ ०१

चांदूर रेल्वे १६६ १६ १६ ०० ००

चांदूर बाजार ९९ २१ १६ ०५ ००

चिखलदरा ८८ ०४ ०४ ०० ००

धारणी २८३ २७ २६ ०१ ००

दर्यापूर १३० १६ १६ ०० ००

धामणगाव ११७ ०८ ०७ ०१ ००

तिवसा १५७ ३८ ३४ ०३ ०१

नांदगाव १०४ २१ २१ ०० ००

एकूण २३२६ ४३९ ४१५ २१ ०३

Web Title: In rural areas, 439 corona positive patients were found in 9 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.