ग्रामविकासला सहा कोटींचा भार
By admin | Published: February 17, 2017 12:28 AM2017-02-17T00:28:44+5:302017-02-17T00:28:44+5:30
सार्वत्रिक निवडणूकांची प्रक्रिया सुरू असलेल्या जिल्हा परिषदेचे ५९ गट व पंचायत समितीचे
जिल्हा परिषद ५९ गटांची सार्वत्रिक निवडणूक : ४ कोटी ३३ लाखांचे अनुदान वितरित
गजानन मोहोड अमरावती
सार्वत्रिक निवडणूकांची प्रक्रिया सुरू असलेल्या जिल्हा परिषदेचे ५९ गट व पंचायत समितीचे ८८ गणांसाठी ४० रुपये प्रतिमतदारप्रमाणे ५ कोटी ५६ लाख ५१ हजार ८०० रुपयांचा भार ग्रामविकास विभागावर पडला आहे. सद्यस्थितीत ४ कोटी ३२ लाख ३८ हजार ८५० रुपयांचे अनुदान जिल्ह्यास जानेवारीअखेर वितरित करण्यात आले आहे.
साधारणपणे ३२ रुपये प्रतिमतदारप्रमाणे कार्यालयीन खर्चाचे अनुदान जिल्ह्यास प्राप्त झाले आहे. उर्वरित अनुदान लवकरच मिळण्याची शक्यता जिल्हा निवडणूक विभागाने व्यक्त केली आहे. दोन वर्षांपूर्वी थकीत अनुदान न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या तहसीलदार संघटनेद्वारा ग्राम पंचायत निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध न करण्याचा निर्णय घेतला होता. निर्देशाचे उल्लंघन म्हणून राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व तहसीलदारांचे निलंबन रातोरात केले होते. यावर चर्चेंअंती तोडगा निघाल्याने सर्व तहसीलदारांचे निलंबन मागे घेण्यात आले. यावेळी पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे ग्रामविकास विभागाने मतदार यादीच्या कार्यक्रमासाठी तसेच प्रभाग रचनेबाबतचे नकाशे तयार करणे व इतर अनुषंगिक कामासाठीव त्या अनुषंगाने होणाऱ्या कार्यालयीन खर्चासाठी प्रत्येक जिल्ह्यास १५ लाख रुपये २६ आॅक्टरोंबर २०१६ रोजी उपलब्ध केले व निवडणूक प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या खर्चासाठी राज्याला ११४ कोटी ३० लाख ८७ हजार ३०० रुपये उपलब्ध केले आहेत. यामध्ये जिल्ह्याच्या वाट्याला ४ कोटी १७ लाख ३८ हजार ८५० रुपये आले आहेत व यापूर्वी मतदार यादी व प्रभागरचना आदीसाठी मिळालेले १५ लाख रुपये असे एकूण ४ कोटी ३२ लाख ३८ हजार ८५० रुपये जिल्ह्यास ग्रामविकास विभागाने दिले आहेत व मतदार संख्येच्या प्रमाणात व कार्यालयीन खर्च वगळता प्रति मतदार ३२ रुपयाप्रमाणे हे अनुदान सर्र्व तालुक्यांना वितरित केले आहे. १४ जून २०१६ च्या निर्णयान्वये ग्राम विकास विभागाने अनुदान वितरित केला.