ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था डबघाईस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:05 AM2021-05-04T04:05:15+5:302021-05-04T04:05:15+5:30
एप्रिल, मे व जूनमध्ये साधारणपणे मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. याच महिन्यात खरिपाची लगबग असते, तर विवाह समारंभ ...
एप्रिल, मे व जूनमध्ये साधारणपणे मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. याच महिन्यात खरिपाची लगबग असते, तर विवाह समारंभ मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसुद्धा करतात. परंतु, गेल्या वर्षीपासून कोरोना विषाणूने लग्न सोहळे पूर्णतः बंद असल्याने अर्थव्यवस्थेला लगाम लागल्याचे दिसत आहे.
यावर्षी गव्हाची व हरभऱ्याची पेरणी अधिक प्रमाणात झाली. परंतु, आजही शेतकऱ्यांच्या घरामध्ये हा धान्य माल पडून असल्याने शेतकरीसुद्धा आर्थिक खाईत सापडला आहे.
शेतकऱ्यांबरोबरच शेतमजूरही आर्थिक विवंचनेत आहे. शेतकऱ्यांच्या भरवशावर शेतमजुरांची उपजिविका अवलंबून असते. मात्र, शेतकऱ्याकडे आर्थिक सुबत्ता नसल्यामुळे शेतमजुरांसमोर रोजची जेवणाची भ्रांत आहे. शेतीच्या मालाला अधिक भाव नसल्याने मिळेल त्या भावात विक्री करावे लागत असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.