रेकॉर्डवरील गुन्हेगारावर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

By जितेंद्र दखने | Published: March 19, 2024 09:17 PM2024-03-19T21:17:52+5:302024-03-19T21:18:11+5:30

१९८१ गुन्हेगारावर प्रतिबंधात्मक कारवाई:८ जणांवर एमपीडीए

Rural police crack down on criminals on record | रेकॉर्डवरील गुन्हेगारावर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

रेकॉर्डवरील गुन्हेगारावर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

अमरावती: आगामी लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्याचे दृष्ट्रीने ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशानुसार सक्रीय रेकॉर्डवरील गुन्हेगारावर प्रतिबंधात्मक कारवाईची मोहीम ग्रामीण पोलिसांनी सुरू केलेली आहे.

जिल्ह्यात सन २०२३-२४ मध्ये विविध प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने १९८१ गुन्हेगाराविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई केली असून यापैकी १०५८ प्रकरणातील आरोपीतांकडून शांतता व सुव्यवस्था राखण्याबाबत बंदपत्र (बॉण्ड) घेण्यात आले आहेत.या पोलिसांकडून घेण्यात आलेल्या बंधपत्राचे उल्लंघन करणाऱ्या ४१ आरोपीतांकडून २ लाख १८ हजार ५०० रूपयाचा दंड वसुल करून शासन तिजोरीत जमा करण्यात आला आहे. याशिवाय वेळोवेळी प्रतिबंधक कार्यवाही करून सुध्दा ज्या आरोपीतांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही अशा ०८ आरोपी विरूध्द एम.पी.डी.ए. कार्यवाही करून त्यांना कारागृहात १ वर्षाकरीता स्थानबध्द तसेच ३१ आरोपी व २ गुन्हेगारी टोळया (गॅंग) विरूध्द तडीपार आदेश प्राप्त करून जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

आगामी काळात निवडणूक दरम्यान कायदा व सुव्यस्था अबाधीत राहण्याचे दृष्ट्रीने अमरावती ग्रामीण मध्ये जे इसम वारंवार गुन्हे करण्याचे सवयीचे आहेत. तसेच ज्यांच्यावर मागील निवडणूक दरम्यान गुन्ह्यांची नोंद आहे अशा १५० व्यक्ती विरूध्द प्रतिबंधात्मक कार्यवाही तसेच अवैध दारू विक्री,वाहतुक, अमंली पदार्थ विक्री,वाहतुक आदी गुन्हे करणारे व्यक्ती विरूध्द एम.पी.डी.ए.तसेच ३० सवयीचे सराईत गुन्हेगार मालमत्ता,शरीराविरूध्दचे गुन्हे करणाऱ्या विरूध्द निवडणूक पूर्व तडीपार कार्यवाही करण्याचे प्रस्तावीत असून सदर बाबींची पुर्तता करण्याकरीता विशेष प्रतिबंधक कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. निवडणूक कालावधीत शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहण्याचे दृष्टीने गुन्हेगार,समाजविघातक कृत्य करणाऱ्या व्यक्ती तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या विरूध्द कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे.

Web Title: Rural police crack down on criminals on record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.