ग्रामीण डाकसेवक उतरले रस्त्यावर
By admin | Published: November 28, 2015 01:20 AM2015-11-28T01:20:22+5:302015-11-28T01:20:22+5:30
आॅल इंडिया ग्रामीण डाकसेवक युनियनने ग्रामीण डाक सेवकांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शुक्रवारी मुख्य डाक कार्यालयासमोर आंदोलन केले.
अमरावती : आॅल इंडिया ग्रामीण डाकसेवक युनियनने ग्रामीण डाक सेवकांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शुक्रवारी मुख्य डाक कार्यालयासमोर आंदोलन केले. सर्व कर्मचारी संपावर आहेत.
ग्रामीण डाकसेवकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये अधिकारी प्रमुख असलेल्या समितीचा निर्णय मागे घेण्यात यावा, २१ फेब्रुवारी २०१४ च्या आश्वासनानुसार सेवानिवृत्त न्यायाधीश अथवा उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली समिती बसविण्यात यावी, ग्रामीण डाकसेवकांना डाक विभागात समाविष्ट करून विभागीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधा प्रदान करण्यात याव्यात आदी प्रश्नांसाठी डाकसेवकांनी संप पुकारला आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार या कर्मचाऱ्यांनी केला आहे.
आंदोलनात युनियनचे सचिव पी.एच जयस्वाल, बी.एन घुसळकर, एम.के काझी, व्ही.एन भेले, व्ही.एस रिठे, जी.एच उमप, एल.एस डाफे, आर.एस कोहरे, ए,जे.रेचे, पी.एच फाटकर, एस.ए तळकीत एम.एस.सोनोने, एच.पी चरपे, तौसफुद्दीन वहीवृद्दीन, एस.एच धांडे, ज्योत्स्ना चव्हाण आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)