जीव धोक्यात घालून शववाहिका चालकांचा सेवेचा यज्ञ अविरत सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:16 AM2021-04-30T04:16:40+5:302021-04-30T04:16:40+5:30
सुरक्षिततेची घेतात काळजी, महापालिका पुरविते पीपीई किट, साधने अमरावती : कोरोना संसर्गाने सर्व जण हैराण झाले आहेत. या काळात ...
सुरक्षिततेची घेतात काळजी, महापालिका पुरविते पीपीई किट, साधने
अमरावती : कोरोना संसर्गाने सर्व जण हैराण झाले आहेत. या काळात काेरोना योद्धे म्हणून अनेक जण मदतीसाठी पुढे आले आहेत. यात शववाहिकाचालकांची भूमिका महत्त्वाची आहे. या शववाहिकांमध्ये २० कर्मचारी कार्यरत आहेत. कोविड रुग्णालयात मृत रुग्णांना घेऊन हे चालक हिंदू स्मशानभूमी, विलासगनर, शंकरनगरपर्यंत नेत असतात. तेथे नेमलेले कर्मचारी त्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत असतात. महापालिकातर्फे या चालक, वाहकांना मास्क, पीपीई किट, सॅनिटायझर पुरविले जाते. मृतदेह रुग्णालय ते स्मशानभूमी दरम्यान नेताना शववाहिकांचे चालक, कर्मचारी हे स्वत:च्या जीवाची काळज़ी घेत हे योद्धे मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेण्याचे काम करीत असतात.
------------------
अशी आहे आकडेवारी
शववाहिका : ०७
चालकसंख्या : २०
-------------
जिल्ह्यातील १०८ च्या रुग्णवाहिकांची संख्या : २९
-----------------
महापालिकेच्या दोन तर, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या पाच शववाहिनी आहेत. त्याकरिता २० जणांची चमू तयार केली असून, रुग्णालयातून अंत्यसंस्कार करेपर्यंत ही चमू काम करीत आहे. सर्वांचे काम विभागून देण्यात आले आहे. त्या सर्वांना पीपीई किट, मास्क, सॅनिटायझर अशा सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
- प्रशांत रोडे, आयुक्त महापालिका
-----------------
शववाहिकेतील कर्मचारी तसेच हिंदू स्मशानभूमीमधील कर्मचाऱ्यांना काळजीपूर्वक अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासोबत त्यांना पीपीई किट, मास्क, हॅन्डग्लोज, सॅनिटायझर अशा सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
- चेतन गावंडे, महापौर