साद्राबाडीत दहशत कायम रोजगारही हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 11:17 PM2018-09-01T23:17:40+5:302018-09-01T23:18:15+5:30

साद्राबाडीसह लगतच्या पाच गावांमध्ये दोन आठवड्यानंतरही नागरिक जीव मुठीत घेऊन राहात असल्याचे वास्तव आहे. दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले अन् रोजगारही हिरावला गेला. धक्क््यांची कमी होत असलेली तीव्रता हा दिलासा मानला तरी भूकंपाची दहशत नागरिकांच्या मानगुटीवर आहे. जिल्हा प्रशासनाद्वारा केवळ धीर दिला जात आहे. याने पोट भरेल काय, हा आदिवासी बांधवांचा सवाल आहे.

Sadarbandi terror continues to be permanent | साद्राबाडीत दहशत कायम रोजगारही हिरावला

साद्राबाडीत दहशत कायम रोजगारही हिरावला

Next
ठळक मुद्देदोन आठवड्यानंतरही स्थिती जैसे थै : दिनचर्या विस्कळीत, संसार उघड्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : साद्राबाडीसह लगतच्या पाच गावांमध्ये दोन आठवड्यानंतरही नागरिक जीव मुठीत घेऊन राहात असल्याचे वास्तव आहे. दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले अन् रोजगारही हिरावला गेला. धक्क््यांची कमी होत असलेली तीव्रता हा दिलासा मानला तरी भूकंपाची दहशत नागरिकांच्या मानगुटीवर आहे. जिल्हा प्रशासनाद्वारा केवळ धीर दिला जात आहे. याने पोट भरेल काय, हा आदिवासी बांधवांचा सवाल आहे.
साद्राबाडी, झिल्पी, गावलानडोह, पाथरपूर, सुसर्दा व राणीपिसा आदी गावांची दिनचर्याच या पंधरवड्यात बदलली. २१ आॅगस्टच्या मोठ्या धक्क्यानंतर गावातील अनेक घरांना तडे गेलेत. या ठिकाणी प्रशासन राहू देत नाही. तंबूत दिवस कसे काढावे, या विवंचनेत नागरिक आहेत. गावाला जो-तो भेट देत असल्याने जणू पर्यटनाचे स्वरूप आले. या प्रत्येकाशी बोलताना दहशतीत असलेला आदिवासी बांधव आणखीन भेदारला गेला. त्यांचे फोटोसेशन होत आहेत, तर पुढ कसं, या प्रश्नाने आदिवासींच्या जिवाची घालमेल होत आहे.
मुलांच्या शाळा होत आहेत. पण शैक्षणिक भविष्य आहे काय? धक्क्यांनी मोठ्यांच्या तोंडचे पाणी पळाले, तिथे चिमुकल्यांकडून अपेक्षा तरी किती करणार? गुरुजीच जीव मुठीत घेऊन शाळेत येतात. सुरुवातीला तर मुलेच शाळेत जायला धजावले नाहीत. पीएचसीच्या इमारतीला तडे गेल्याने उपचार तंबूत सुरू आहेत. साधारणपणे पाच हजार नागरिक बाधित आहेत. दोन हजारांवर गाव सोडून इतरत्र आश्रयाला गेले आहेत. अचानक कोणी आजारी पडले, तर १५-२० किमी अंतरावरील धारणीशिवाय पर्याय नाही. २०१३ मध्ये अशाच भूगर्भातील हालचाली झाल्यात. या पाच वर्षात या ठिकाणी काय सुविधा उभारल्या, याचे उत्तर आज प्रशासनाजवळ नाही. धक्क्यांची तिव्रता कमी होईल, अहवालही सादर होईल, पुन्हा कागदी घोडे नाचतील, त्यापुढे काय, याचे उत्तर प्रशासनाच द्यावे लागणार आहे.
एमपीमधील पंधनामध्ये दशकापूर्वी हीच स्थिती
साद्राबाडीपासून २५ किमी अंतरावर असलेल्या मध्य प्रदेशातील पंधना तालुक्यात १९९७-९८ मध्ये अशाच प्रकारे भूगर्भातून आवाज यायचे. यावेळीदेखील जीएसआयची चमू दाखल झाली होती. नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत हा प्रकार झाला होता. याची तीव्रता ही २ रिश्टर स्केलपर्यत होती. भूगर्भात पाणी झिरपल्यानेच वायूची हालचाल होऊन असे प्रकार होत असल्याचा निष्कर्ष निघाल्याचे जीएसआयच्या सूत्राने सांगितले.
दोन्ही पथकांना माध्यमांशी बोलण्यास बंदी
साद्राबाडी येथे नागपूर येथील जिआॅलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडिया (जीएसआय) तसेच दिल्ली येथील नॅशनल सेंटर फॉर सिस्मोग्रॉफ (एनसीएस) चमू दाखल आहेत. माध्यम प्रतिनिधींशी बोलण्यास जिल्हा प्रशासनाने मनार्ई केल्याची माहिती जीएसआय पथकातील तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे साद्राबाडी येथे भूगर्भात नेमके काय सुरू आहे याची माहिती जिल्हा प्रशासन दडवित तर नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

साद्राबाडीत नागरिकांशी संवाद साधून शंकाचे निरसन करण्यात आले. येथे उपस्थित दोन्ही पथकांशी चर्चा केली. दिवसेंदिवस धक्क््यांची तीव्रता कमी होत आहे. उशिरापर्यंत अहवाल अपेक्षित आहे.
- के. पी. परदेशी
अपर जिल्हाधिकारी

भूगर्भात झिरपलेल्या पाण्याने पोकळी भरत असल्याने ही हालचाल होत आहे. तीन यंत्रांच्या आठ दिवसांच्या नोंदींच्या अभ्यासानंतरचा निष्कर्ष व अहवाल डीएमकडे सादर करण्यात येईल.
- मिलिंद धकाते
संचालक, भूकंपविज्ञान विभाग

Web Title: Sadarbandi terror continues to be permanent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.