मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सफारी आजपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:10 AM2021-06-28T04:10:09+5:302021-06-28T04:10:09+5:30

वनउद्यानाला लागणार टाळे, वीकएंडला हजारो पर्यटकांची गर्दी, ट्राफिक जाम नरेंद्र जावरे - चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटनस्थळावरील ...

Safari at Melghat Tiger Reserve closed from today | मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सफारी आजपासून बंद

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सफारी आजपासून बंद

Next

वनउद्यानाला लागणार टाळे, वीकएंडला हजारो पर्यटकांची गर्दी, ट्राफिक जाम

नरेंद्र जावरे - चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटनस्थळावरील मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत पर्यटकांसाठी चालविण्यात येणारी जंगल सफारी सोमवारपासून बंद करण्यात येत आहे. अप्पर प्लेटो स्थित वनउद्यानालासुद्धा टाळे लावण्यात येणार आहे. यादरम्यान शनिवार-रविवार या दोन दिवसांत हजारो पर्यटकांनी चिखलदऱ्यात गर्दी केली. शहरातील मुख्य चौकात ट्राफिक जाम झाले होते.

कोरोनाचा धोका पाहता राज्य शासनाच्यावतीने शुक्रवारी नवीन आदेश जारी करण्यात आले. शनिवारी सकाळी ७ ते सायंकाळी ४ दरम्यान प्रतिष्ठाने सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले. दुसरीकडे मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या जंगल सफारीला बंद करण्यात येत असल्याचे व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागांतर्गत स्पष्ट करण्यात आल्याने पर्यटकांच्या उत्साहात विरजण पडणार आहे.

बॉक्स

तीन दिवसांत सफारी बंद

नागपूर येथील प्रधान वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी तीन दिवसांपूर्वी जंगल सफारीसंदर्भात जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सुरू करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागातील चिखलदरा येथून जाणारी वैराट जंगल सफारी शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस सुरू ठेवण्यात आली. सोमवारपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बंद ती बंद केली जाणार असल्याचे सहायक वनसंरक्षक राजकुमार पटवारी यांनी सांगितले. सेमाडोह व कोलखास येथील जंगल सफारी आणि हत्ती सफारी सुरू करण्यापूर्वीच बंद झाली, हे विशेष. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत मेळघाटात येणाऱ्या पर्यटकांचा उत्साह मावळला आहे.

बॉक्स

हजारो पर्यटकांची गर्दी, वाहनांच्या रांगा

चिखलदरा पर्यटन स्थळावर शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस वीकएंड सुटीत १२ हजारांहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली होती. चिखलदरा नगरपालिकेला एक लाख रुपयांच्या जवळपास पर्यटन कर प्राप्त झाला. येथील प्रत्येक पॉईंटवर दुचाकी, चारचाकी व मोठ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शहरातील वनउद्यान चौक व बाजारातील चौकात ट्राफिक जामसारखी स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कोट

कोरोना नियमांचे पालन व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गुगामल वन्यजीव विभागातील जंगल सफारी सोमवारपासून बंद करण्यात येत आहे. वन उद्यानसुद्धा बंद राहील.

राजकुमार पटवारी, सहायक वनसंरक्षक, गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा

Web Title: Safari at Melghat Tiger Reserve closed from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.