शहरात झळकली 'सेफ वूमन, सेफ सिटी'ची पोस्टरे
By admin | Published: November 26, 2015 12:10 AM2015-11-26T00:10:36+5:302015-11-26T00:10:36+5:30
महिला सुरक्षित असतील तर शहर सुरक्षित राहू शकते या संकल्पनेतून शहर कोतवाली पोलीस ठाण्याचे ठाणेदार दिलीप पाटील यांनी...
ठाणेदार पाटलांचा उपक्रम : महिलांच्या सुरक्षेसाठी हेल्पलाईन
अमरावती : महिला सुरक्षित असतील तर शहर सुरक्षित राहू शकते या संकल्पनेतून शहर कोतवाली पोलीस ठाण्याचे ठाणेदार दिलीप पाटील यांनी अभिनव उपक्रम राबवून शहरात 'सेफ वुमन सेफ सिटी'ची पोस्टरे लावली. २५ नोव्हेंबर जागतिक महिला अत्याचार दिनानिमीत्त हा उपक्रम शहर कोतवाली पोलिसांनी राबविला असून त्यामध्ये १० पोलीस अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक व तीन लॅन्डलाईन क्रमांक महिलेच्या मदतीसाठी सार्वजनिक करण्यात आले आहे.
महिलांवरील अत्याचार व छेडखाणीच्या वाढत्या घटना लक्षात घेवून महिलांना तत्काळ मदत मिळावी या उद्देशाने शहर कोतवाली ठाणेदार दिलीप पाटील यांनी महिला छेडखाणी सुरक्षितता अभियान हा अभिनव उपक्रम राबविला. त्यांनी शहरातील पटवा चौक, गांधी चौक, शाम चौक, सायस्कोर मैदान, इर्विन चौक, मणीबाई गुजराती हायस्कुल परिसर व ज्ञानमाता हायस्कुलसमोर 'सेफ वुमन सेफ सिटी 'ची पोस्टरे लावून पिडित महिलांसाठी मोबाईल क्रमांक सार्वजनिक केले.