ऐतिहासिक सायन्स कोअर मैदानाची सुरक्षा होणार अभेद्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:44 AM2019-05-31T00:44:01+5:302019-05-31T00:44:46+5:30
शहराच्या हदयस्थानी असलेल्या जिल्हा परिषदेच्या सायन्स कोअर मैदानाची झालेली दयनीय अवस्था झाली आहे. या ठिकाणी चालणारे अवैध प्रकार वाढले आहेत. त्यामुळे सायन्स कोअर मैदानाची सुरक्षा व अन्य उपाययोजनांसाठी ३० मे रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार सुनील देशमुख, आमदार वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थिती बैठक घेण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहराच्या हदयस्थानी असलेल्या जिल्हा परिषदेच्या सायन्स कोअर मैदानाची झालेली दयनीय अवस्था झाली आहे. या ठिकाणी चालणारे अवैध प्रकार वाढले आहेत. त्यामुळे सायन्स कोअर मैदानाची सुरक्षा व अन्य उपाययोजनांसाठी ३० मे रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार सुनील देशमुख, आमदार वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थिती बैठक घेण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या सायन्स कोअर मैदानाची दुरवस्था झाली आहे. शहराच्या मध्यभागी असलेले हे मैदान मद्यपींचा अड्डा बनले आहे. यासोबतच या ठिकाणी बलत्कार, खून यांसारख्या घटना घडल्या आहेत. आता तर अवैध वाहतुकीचा ठिय्या येथे पडला आहे. कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या सर्व प्रकारामुळे मैदानाचे गतवैभव नामशेष होत आहे. त्यामुळे सायन्स कोअर मैदानाची सुरक्षा तसेच या परिसरात स्वच्छता राखण्याचे अनुषंगाने जिल्हा परिषद पदाधिकारी व सीईओंना शहराचे आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी लेखी पत्राद्वारे सुरक्षिततेच्या उपाययोजना तातडीने करण्याची मागणी केली होती. याची दखल घेत जिल्हा परिषद पदाधिकारी व प्रशासनाने मैदानाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत मैदानाच्या सुरक्षितेसाठी जिल्हा परिषदेने ४० लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे. या प्रस्तावाला येत्या १० जून रोजी शिक्षण व बांधकाम समिती मंजुरी देईल. यानंतर प्रस्ताव स्थायी समितीपुढे सादर केला जाणार आहे. यानंतर लगेच कामाच्या निविदा काढून संपूर्ण मैदानाची भिंत अडीच फुटाने उंच करून त्यावर तारेचे कुंपण, तीन प्रवेशद्वार, सीसीटीव्ही कॅ मेरे, हायस्माट लाइट व सुरक्षा रक्षक या उपाययोजना केल्या जाणार आहेत.
बैठकीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, शिक्षण व बांधकाम सभापती जयंत देशमुख सीईओ मनीषा खत्री, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आर.डी. तुरणकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी रवींद्र येवले, बांधकाम विभागाच्या उपअभियंता मेश्राम, शाखा अभियंता संजय ठाकूर आदी उपस्थित होते.
डीपीसीकडे एक कोटींच्या निधीचा प्रस्ताव
जिल्हा परिषदेच्या सायन्स कोअर शाळेच्या मैदानाच्या कायमस्वरूपी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यासाठी ३१ मे रोजी होत असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठक ीत सुमारे एक कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्यावतीने आ. वीरेंद्र जगताप मांडणार आहेत. यामध्ये मैदानात जवळपास ४०० मीटर ट्रॅक, सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता, सुरक्षा भिंतीसाठी चेनलिंक फेसिंग, चहुबाजूंनी हायमास्ट लाइट व अन्य महत्त्वाच्या उपाययोजनांचा समावेश आहे. सदर प्रस्तावानुसार निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली जाणार आहे. हा निधी मिळाल्यास या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना होऊन येथील अवैध प्रकारांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे डॉ. सुनील देशमुख यांनी सांगितले.